कृतज्ञ आभार
यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेतील हे विचारधन “अक्षर रूपाने” आपल्या हाती देताना कृतज्ञतेने अंत:करण भरून येते.
आमच्या निमंत्रणाला मान देऊन माननीय प्राचार्य देवदत्त दाभोळकर प्राचार्य मा. प. मंगुडकर आणि प्रा. गं. बा. सरदार या थोर विचारवंतानी एक एक विचाराचे कोरीव लेणे मराठी मनावर कायमचे कोरून ठेवले आहे. त्या सर्वांचे कृतज्ञ आभार मानणे आमचे कर्तव्य आहे !
थोर शब्दांचे हे ‘ अक्षर ’ स्वरूप प्रकट होताना; डॉ. निशिकांत मिरजकर यांनी परिश्रम घेतले आहेत. शामराव घळसासी अशा कामात सतत सहकार्य देत आले आहेत या कार्यातही त्यांनी जिव्हाळ्याने तसदी घेतली आहे.
कराडमधील या दोन्ही साहित्य सेवकांचा अशा कामावरील लोभ, उपक्रमांना रेखीव रूप देणारा ठरतो. म्हणून त्यांचे सप्रेम आभार मानतांना आपलेपणाचा आनंदही साठलेला असतो.
श्रीधर मुद्रणालयाचे व्यवस्थापक नि कामगार यांनी ही पुस्तिका वेळेवर व सुबक छापून दिली त्या बद्दल आभारी आहोत.
कराड १२ मार्च १९७४
पी. डी. पाटील नगराध्यक्ष.