व्याख्यानमाला१९७३-२०

आपल्या देशाची प्रगती व्हावयाची असेल तर आपले संकुचित हितसंबंध बाजूस सारले पाहिजेत. हे त्यानी मान्य केले. जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्रीयत्वाची कल्पना आपण १९८५ पासून स्वीकीरलेली आहे. आता राष्ट्रीयत्व ध्येयवादाच्या दृष्टीने तत्वत: धर्मनिरपेक्ष होते हे खरे आहे. पण प्रत्यक्ष व्यवहार काय घडला याचाही विचार केला पाहिजे. तत्व आणि व्यवहार यांच्या मिलाफातून समाजाची घडण बनत असते. राष्ट्रीय चळवळीला सुरवात सुमारे शंभर वर्षापूर्वी झाली या शंभर वर्षात जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्रीयत्वाची कल्पना आपल्यामध्ये कीती प्रमाणात रूजली आहे याचा आपण प्रांजलपणे विचार केला पाहिजे.

राष्ट्रीयत्वाची कल्पना येथे प्रथम पाश्चात्य विद्येच्या संस्कारांमधुन आली. हा पाश्चात्य विचार म्हणजेच आधुनिक विचार. आधुनिक राजकिय व औद्योगिक क्रांती प्रथम इंग्लंडमध्ये झाली. म्हणून नव्या विचारांचा उगमही झाला. इंग्रजी भाषेच्या व्दारे या आधुनिक विचारांचे लोण आपल्यापर्यत येऊन पोहोचले. इंग्रजी विद्या हे वाघीणीचे दुध आहे असे विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी म्हटले आहे. याचा अर्थ इंग्रजी भाषेला महत्व आहे असा नाही.

त्यामुळे हे वाङ्यमय वाचणा-या माणसाच्या मनात स्वातंत्र्यप्रीती व देशाभिमान संचारेल असे चिपळूणकरांचे म्हणणे होते. इंग्रजांशी संबंध आल्यावर भारतच्या आधुनिकीकरणाला प्रारंभ झाला. या स्थित्यंतराला दोन गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत झाल्या. एक म्हणजे ख्रिस्ती धर्मोपदेशकांचा धर्मप्रसार व दुसरे इंग्रजी शाळातून मिळणारे विज्ञानाते शिक्षण. यांपैकी आपल्या नवशिक्षितांवर विज्ञानापेक्षा ख्रिस्ती धरमाचाच प्रभाव अधिक पडला. राम मोहन रॉय पासून गांधी विनोबापर्यत आपले सर्व लोकप्रिय राष्ट्रीय नेते अत्यंत धार्मिक वृत्तीचे आहेत. आगरकरांसारखा एकादा अपवाद आंढलतो. पण आगरकर अज्ञेयवांदी असल्याने फारसे लोकप्रिय झाले नाहीत. बरे, उच्चवर्णींयांचेच नेते धार्मिक होते, असे नाही. महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर याचा पिंडही धार्मिकच आहे. हे नेते जर धार्मिक नसते, तर कदाचित त्याना येथील जनतेच्या मताची पकड घेता आली नसती हेही खरं आहे. पण आपल्याला आता नवे काही घजवावयाचे आहे; म्हणून इतिहासात जे काही घडले तही आपण नीट समजून घेतल पाहिजे. महात्मा गांधी व लोकमान्य टिळक व्यक्तिश: फार मोठे होते. यांच्या नखाची सरही आपल्याला येणार नाही. पुण्याईवरच आपले वैचारिक जीवन उभे आहे. पण आपल्याला पुढे जायचे असेल, तर या नेत्यांच्या मर्यादाही आपण समजून घेतल्या पाहिजेत. वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून इतिहासाचे विश्लेषशण केले पाहिज. केवळ अंधश्रध्देला सांप्रदायिक अभिनिवेशाला आपण बळी पटलो तर इतिहासापासून आपण आपण काहीच बोध घेऊ शकणार नाही. एकोणिसाव्या शतकात ख्रिस्ती धर्माचा योथील सुशिक्षितांवर खूपच परिणाम झाला ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या प्रचाराला आपले लोक बळी पडू नयेत अशी इच्छा असेल. तर आपल्या धर्मात सुधारणा घडवून आणण्याखेरीज गत्यंतर नाही याबद्दल येथील सुशिक्षितांची खात्री पटली. त्यामधून ब्राह्मोसमाज, आर्यसमाज, प्रार्थनासमाज, सत्येशोधक समाज, अशा अनेक मंडळ्या स्थापन झाल्या. विवेकांनंदानी अमेरिकेत हिंदू धर्माची ध्वजा फडकावून संघटितरित्या कार्य करण्यास जेव्हा सुरवात केली, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर ख्रिस्ती मिशनचा आदर्श होता. गोखले यांनी   यांनी हिंद सेवक समाज (Servant of  India  Society )  या संस्थेच्या कार्यकर्त्यांत मिशन-याची निष्ठा व तन्मयता असली पाहिजे अशी अपेक्षा बाळगली होती. ख्रिस्ती धर्मोपदेशक धर्मप्रसारांच्या हेतूने प्रथम खेड्यापाड्यात गेले गोरगरिबांची, अनाथ अपंगांची त्यानी सेवा केली. हिंदू धर्मातील उच्चवर्णीयच खालच्या थरांतील लोकांचा विटाळ मानीत असत. या गो-या मिशन-यांनी त्यांना जवळ केले. राज्यकर्त्यांचे धर्मबंधू,पौर्वात्य व पाश्चात्य अशा दोन्ही विद्यांमध्यें पारंगत असणारे डॉ. विल्सन सारखे लोक खेड्यांत जाऊन दलितांची आपुलकीने विचारपूस करू लागले. खेड्यांतील लोकातची मने त्यांनी आपल्या सेवाभावाने जिंकून घेतली. त्यांच्या कार्यकर्त्यातील नैतिकतेचा आपल्याकडील सुशिक्षितांवर फार मोठा प्रभाव पडला.  आणि त्यांना समाजसेवेची प्रेरणा मिळाली. विज्ञाननिष्ठा मात्र आजतागायत आपण आत्मसात करू शकलो नाही. लोकशाहीत धर्मश्रध्दा ही व्यक्तीच्या खाजगी जीवनापुरती मर्यादित राहिली पाहिजे, सामाजिक व्यवहारात धर्माची लुडबुड असता कामा नये, पण ही बुध्दिनिष्ठा, ही धर्मनिरपेक्षता इथे रूजली नाही. पारतंत्र्याच्या काळात आपल्या राष्ट्रपुढे एक मोठा पेच होता. एका बाजूला इग्रजांशी लढायचे होते. दुसरीकडे आपल्या राष्ट्राच्या सर्वागीण प्रगतीसाठी त्यांच्या समाजव्यवस्थेंतील नवी नवी मूल्य आपल्याला आत्मसात करायची होती. एकीकडे त्याना विरोध करायचा व दुसरीकडे त्यांचे अनुकरमावर होता. त्यामुळे राज्यकर्त्यांना हिरीरीने विरोध करणे त्यांना जमले नाही. साहाजिकच त्यांच्या ठिकाणी राष्ट्राभिमान नाही अशी त्यांची हेटाळणी करण्यात आली. उलट हेच ज्यांचे उद्दिष्ट होते, ते लोकांमध्ये प्रतिकारक्षमता आणण्यासाठी धडपडत होते. इंग्रजांच्या अनुकरणावर भर दिल्यास लोकांच्या स्वाभिमानाला धक्का बसेल अशी त्यांना भीती वाटत होती. म्हणुन आपला इतिहास, संस्कृती, धर्म, भाषा यांचे गोडवे गायला त्यांनी सुरवात केली. त्यातून पुनरूज्जीवनवादी प्रवृत्ती निर्माण झाली. आपल्या संबंध राष्ट्रवादी परंपरेमध्ये उदारमतवादाचा पराभव झालेला आहे. इथे रानडे आगरकर यांचा पराभव झालाच, पण फुले, आंबेडकर यांचाही पराभव झाला. महात्मा गांधीना जरी वैयक्तिक लोकप्रियता लाभली, तरी त्यांच्या तत्वज्ञानाचा पराभव झाला आहे.