* लोकसाहित्य :  साजशिणगार, संपादिका डॉ. सरोजिनी बाबर प्रका. १९६४

जीवन पराकोटीचे समर्पित असेल तर ते कधीच जीर्ण होत नाही, चंद्र कधी जुना होत नाही. सूर्याला म्हतारपण येत नाही, दर्या कधी संकोचत नाही. यातील प्रत्येकाच्या जीवनात पराकोटीचे समर्पण आहे, पण अनंत युगे लोटली तरी विनाश त्यांच्याजवळ पोहचलेला नाही. लोकसाहित्य निश्वसन अखंड आहे. आणि लोकांच्या चालीरीतीत त्यांच्या स्वभावाच्या वैशिष्ट्याचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. लोकसाहित्य आपण चाखले पाहिजे आणि ते शोधून काढण्याचे दूरदृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्‍न केले पाहिजे, तरच बाहेरच्या लोकांना आपला समाज काय आहे हे जाणून घेता येईल. लोकसाहिच्याचा अजूनही अनादर केला जातो, लोकसाहित्याच्या मर्मावर बोट ठेवून पू्र्ततेसाठी खास प्रयत्‍न केले आहेत. याचे प्रत्यंतर या ग्रंथाच्या प्रस्तावनेत येते.

* संघर्ष ( श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जीवनावरील कादंबरी ) लेखिका मीना जोशी. प्रका. १९८२ .

हिंदुस्थानसारख्या एका विशाल देशात अखिल सामान्यजनांचा विश्वास असणारी ही एक व्यक्ती म्हणजे एक शक्ती आहे. अर्थात ही शक्ती त्या व्यक्तीची राहात नसून ती त्या देशीची बनते व त्यामुळे देश सार्थ होतो आणि तो देश आत्मविश्वासाने प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकू शकतो.

श्रीमती मीना यांच्या या कथेत  ‘संघर्ष ’ या नावाखाली श्रीमती इंदिरा गांधी यांचे जीवन गुंफले आहे. एखाद्या व्यक्तीचे जीवन एका शब्दात सांगावयाचे असेल तर तसा शब्द शोधणे सहजासहजी सोपे नसते, पण श्रीमती इंदिरा गांधी यांच्या बाबतीत संघर्ष हा शब्द औचित्यपूर्ण आहे. य़ा एका शब्दात त्यांच्या सर्व जीवनाचे सार आले आहे. एक कर्तबगार जीवन पुढे पुढे जात आहे. त्यापासून अनेक आशा- अपेक्षा आहेत. अशा जीवनाची ही गाथा वाचनीय झाली आहे यात शंका नाही.

* खंङेराव बागल यांचे निवडक लेख, संपादक :  भाई माधवराव बागल, प्रका. १९७६.

महात्मा फुले यांनी जे वैचारीक आंदोलन महाराष्ट्रात निर्माण केले, त्या
वातावरणात वाढलेल्या पिढीतील श्री. खंङेराव बागल हे एक महत्वाचे विचारवंत होते. त्यांची निष्ठा व्यासंगावर आधारलेली होती. त्यामुळे  त्या निष्ठेला दूरदृष्टी लाभलेली होती. त्या विचारातील  सर्वच आग्रह सर्वांना मान्य होतील असे नाही. ब्राम्हण – ब्राम्हणे तर वादावरील त्यांचे विश्लेषण आणि इंग्रजविरोधी राष्ट्रीय चळवळीसंबंधीचे त्यांचे विवेचन यासंबंधी जरुर मतभेद होतील., परंतु दलित समाजाबद्दल ज्या पोटतिडकीने त्यांनी लिहिलेले आहे, ते आजही मार्गदर्शक ठरेल असे मला वाटते. असे मत या पुस्तकाच्या प्रस्तावनेत व्यक्त केले आहे.

* अमृतपत्र, लेखकर भा. द. खेर. प्रका. १९७०. ( चिरंजीव अमृतगाथा )

स्व. लालबहादूर शास्त्री यांची भारताचे महामंत्री म्हणून अवघी अठरा महिन्यांची कारकिर्द झाली. या अठरा महिन्यात भारताचा जो इतिहास घडला त्यामध्ये ‘ शास्त्रीचा हिंदुस्थान ’ म्हणून एक आगळा हिंदुस्थान आकाराला आला. लो. टिळकांचा हिंदुस्थान अशी हिंदुस्थानची गेल्या शतकभरातली विविध स्वरुपे आहेत. या देशाच्या संकटकाळात नेतृत्वाचे जे रुप, जो अवतार इतिहासाला आवश्यक वाटला, तसा तो या भूमीत साक्षात अवतरला आणि संकटाचा परिहार झाला. शास्त्रींचं या ‘ वामन ’ अवतारातील कार्य असंच चिरंजीव ठरलं आहे. अठरा महिन्यांच्या कारकीर्दीची अठराअध्यायी गीता देशातील पन्नास-पंचावन्न कोटी मुखांनी एकसुरानं गावी अशी आहे.

भारत-पाक युद्धाच्या वेळी त्यांनी देशाला नेतृत्व दिलं, प्रेरणा दिली आणि लढाई बंद होताच पाकबरोबर उत्तम ‘ शेजारी-संबंध ’ प्रस्थापित करण्यासाठी सर्व शक्ती पणास लावली, त्या शास्त्रींची ही अमृतगाथा प्रत्येक मराठीचिये घरी असलीच पाहिजे.

* छत्रपती शिवराय ( महाकाव्य ), कवि य. दि. पेंढारकर ( महाराष्ट्र कवी यशवंत ). प्रकाशन वर्ष : १९६८.

कविता निव्वळ योजून घडत नाही म्हणतात, ती स्फुरावी लागते. अनुभूतीची उत्कटता भावनांच्या पंखावर बसून शब्दरुपे घेते तेव्हा कवितेचा जन्म होतो. असंख्य स्त्री-पुरुषांनी पिढ्यानपिढ्या अनुभवलेल्या उत्कट अनुभूती आणि त्यांच्या जीनवातील प्रीती, कारण आणि पराक्रम या प्रबळ प्रवृत्तींना साद घालणार्‍या प्रेरणांना आपल्या प्रतिभेने देणारा कवी भेटतो तेव्हा महाकाव्याचा जन्म होतो.

समर्थ रामदासांनी चाफळाच्या ज्या दर्‍याखोर्‍यातून शिवरायांचा संदेश पोहोचविला, योगायोगाने त्याच चाफळ्याच्या दर्‍याखोर्‍यातून आलेले हे कवी यशवंत महाकाव्याच्या रुपाने समर्थांचे शब्द खरे करीत आहेत. आमच्या पिढीतील श्रेष्ठ कवी शिवरायांची महापूजा आपल्या महाकाव्याने बांधीत आहेत.