महाराष्ट्रातील दुष्काळ - १६९

१७. बबनराव बडदारे

सातारा

प्रश्न :  प्रवाही पाट पाण्यापेक्षा वरील ठिबक सिंचन केव्हाही चांगले.  हे सर्वांना ह्यापूर्वीच पटलेले आहे.  परंतु ठिबक-सिंचना साधनांच्या किंमती शेतकर्‍यांना परवडत नाहीत.  ह्या साधनांमधील 'बायबॉल' ह्या भागाच्या आयातीवरील डयूटी (आयात कर) केंद्र सरकारने अथवा महाराष्ट्र सरकारने सूट देऊन किंवा कमी करून ही साधने स्वस्तात उपलब्ध होऊ शकणार नाहीत काय ?

उत्तर :  श्री. बबनराव बडदारे ह्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची चर्चा ह्यापूर्वीही केलेली आहे.  फक्त सिंचनासाठी लागणारे साहित्य ज्या कच्च्या मालांपासून तयार होते, त्यावर कर बसवण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारलाच आहे.  महाराष्ट्र शासनाचा ह्यात काहीही संबंध नाही.  मात्र महाराष्ट्र शासनाने 'बायबॉल' आयातीवरील कर कमी करणे किंवा रद्द करणे ह्याबाबत केंद्र सरकारचे मत वळवण्याचा प्रयत्‍न जरूर करावा.