नवराज्याच्या उदघाटनाच्या संदेशांतच त्यांनी मोकळेपणांनं आपली भूमिका विशद केंली. त्यांनी सांगितलं, “भाषिक राज्याची ओढ ज्या जनतेस वाटत होती त्या जनतेला मुंबई शहराचीहि ओढ होती. महाराष्ट्र व गुजरात या उभय प्रदेशांतील जनतेच्या या भावनांची दखल घेऊनच त्याच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं विशाल मुंबई राज्य आता सुरु होत आहे. या राज्यात सर्व मराठी व गुजराती बंधु एकत्र आले आहेत. भाषिक राज्य जाऊन त्याबद्दल व्दैभाषिक आल्याबद्दल कांही लोकांना नाराजी वाटत आसली, तरी बहुसंख्य जनतेनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. राज्यात सर्व मराठी व गुजराती प्रदेश एकत्र आल्यानं, भाषिक राज्य झाल्यामुळे जो लाभ त्या त्या भागाला मिळाला, तो तर त्यांना मिळणारच आहे, शिवाय परस्पर पूरक बनून सर्वाचा अधिक प्रगत विकास करण्याची संधि मराठी व गुजराती बांधवांना मिळाली आहे.
“ विशाल व्दैभाषिक राज्य जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणारं आहे, त्याच्या विकासाचा पाया घालणारं आहे. राज्य व्दैभाषिक झाल्यानं भाषेच्या व सांस्कृतिक विकासाच्या बाबतींतहि अडथळे येण्याची शक्यता नाही. भारतांत चौदा प्रादेशिक भाषा सरकारमान्य आहेत. त्यांचा विकास अनिर्बंधपणे सुरु आहे. या न्यायानं एका राज्यांत दोन भाषा आल्यावरहि उभय भाषकांचा सांस्कृतिक विकास साधणं शक्य आहे. मुंबई राज्याचे भाषिक पायावर आधारलेले दोन विभाग आहेत. यामुळे भाषेच्या पायावर आधारलेल्या सांस्कृतिक विकासाला प्रत्येक विभागास वाव मिळणार आहे. जिल्ह्यांतल्या राज्यकारभाराची भाषा प्रादेशिकच असल्यानं, यापुढहि शक्य तिथे प्रादेशिक भाषा उच्च पातळीवरील राज्यकारभारांत उपयोगांत आणली जाणार आहे. तसंच उभय भाषांतील वाङ्मय, नाट्य, संगीत व ललितकला यांना व्दैभाषिक राज्याच्या भक्कम आर्थिक स्थितीमुळे आधिक प्रमाणांत उत्तेजन देणं शक्य होणार आहे. मराठी व गुजराती भाषांबरोबर इतर भाषांचाहि योग्य पुरस्कार केला जाईल. एकभाषी राज्य असतांना जे फायदे मिळाले असते ते व्दैभाषिकराज्यांतहि मिळतीलच. भाषिक विचार हा राष्ट्रीय विचारांशीं पूरकव संवादी असला पाहिजे. राष्ट्रहिताची विशाल दृष्टि ठेवून विशाल मुंबई राज्य हें मारठी-गुजराती बांधवांच्या हातीं सुपूर्द केलेलं असल्यानं कुठलाहि श्लेष न काढतां हें राज्य यशस्वी करून दाखवणं ही आपली ऐतिहासिक जबाबदारी आहं.
“ हें सांगत असतांना त्यांत राजकारण वा पक्षकारण आणण्याची माझी इच्छा नाही. सरकारी धोरण आखतांना तें पक्षाच्या कार्यक्रमानुसार आखायचं, पण राज्य कारभार पक्षातीत चालवायचा अशी लोकशाहीची परंपरा असते. ही परंपरा इथे पाळली जाईल. भारतानं लोकशाही समाजवादी समाज-रचनेचं ध्येय साध्य करण्याचा निर्धार केला आहे. देशहित कसं व कोणत्या मार्गानं, कार्यक्रमानं साधावं याबद्दल मतभेद होणं अपरिहार्य आहे. पण उत्पादनवाढ, आर्थिक व सामाजिक समता, बेकारी-निवारण इत्यादि उद्दिष्टं अभिप्रेत आहेत. सरकारकडून चुका होणं स्वाभाविक आहं, सरकारचा प्रमुख या नात्यानं मीहि चुकांपासून अलिप्त असणं शक्य नाही. विरोधी पक्षांनी सरकारच्या चुका दाखवाव्या, पण सरकारचं जे चांगलं काम असेल त्यालाहि साथ द्यावी. टीका होणं हें काभार सुधारण्याच्या दृष्टीनं अवश्य असतं, पण ही टीका विधायक व तात्विक असावी, विघातक व वैयक्तिक नसावी, वृत्तपत्रांच्या विधायक टीकेच्या अनुरोधानं कारभार सुधारण्यात मदत झाली तर तें स्वागतार्हच होईल. वृत्तपत्रं हीं सुद्धा मोठी शक्ति आहे. सरकारच्या चुका दाखवून व सरकारच्या चांगल्या गोष्टींचा जनतेमध्ये पुरस्कार करून वृत्तपत्रं लोकशाही संवर्धनाचं महनीय कार्य करत असतात. सरकारच्या लोकहिताच्या योजनांना जनतेमध्ये प्रभावी साथ मिळवून देण्याच्या कामीं वृत्तपत्रांनी या सरकारला मदत करावी. त्यांनी केलेल्या विधायक कार्याच्या अनुरोधांनं राज्याचा कारभार सुधारण्याला मदतच होईल. तें स्वागतार्ह होईल.
‘ नव्या राज्याच्या राज्यकारभाराची धुरा माझ्याकडे आली आहे. राज्य यशस्वी करून दाखवण्याची सर्वांत अधिक जबाबदारी माझी आहे. नव्या राज्यांत जात, धर्म व भाषा असा भेद न करतां निःपक्षपातीपणानंच राज्यकारभार केला जाईल. भाषेच्या व प्रादेशिकतेच्या तत्वावर सरकारकडून भेदभाव केला जाणार नाही. ज्या दिवशीं व्दैभाषिक राज्य उदयाला आलं त्याच दिवशी सर्व भाषिक वाद संपलें, असं समजूनच सर्वांनी कामास लागलं पाहिजे. नवीन राज्य ही लोकमान्यांची वम. गांधींची कर्मभूमि व पुण्यभूमि आहे. सर फिरोजशहा मेहता, नामदार गोथले, विठ्ठलभाई पटेल यांसारखे राजकारणधुरंधर मुंबई राज्यांतच होऊन गेले. सरदार पटेल आणि आचार्य विनोबा भावे यांच्याकारख्या नररत्नामुळे मुंबई राज्याची प्रभा सर्वत्र फाकली आहे. लोकांची सेवा करण्याची आधिकाधिक संधि मला प्राप्त व्हावी यासाठी वडिलधा-यांचे आशीर्वाद, बरोबरीच्यांचं सहकार्य आणि धाकट्यांची मदत यांची मला जरुरी आहे.”