व्याख्यानमाला-१९९५-९६-२०

परंतु या शिक्षण सार्वत्रिक करण्याच्या निर्णयाची मुतबंद अंल करणारी व्यवस्था मांडता आली नाही. लॉर्ड मेकॉलेने १८३६ पासून सुरू केलेली शाळापद्धती हीच प्रमाण मानून, आम्ही त्या वाढवावयाच्या प्रयत्नाला लागलो. यशवंतरावांनी या शिक्षण प्रसाराच्या कामाला अग्रक्रम दिला. प्राथमिक शिक्षण ही सरकारची जबाबदारी हे स्वीकारून ते शिक्षण प्रसाराला लागले. शालेय फीमुळे गरीबांना शाळेत मुले पाठवणे शक्य होत नव्हते. अशा गरीब पालकांच्या मुलामुलींची शालेय फी भरायी जबाबदारी सरकारकडे घेतली. गांव तिथे शाळा काढण्याचा संकल्प केला. प्राथमिक शाळांच्या विस्ताराबरोबर माध्यमिक शाळांची मागणी वाढली. महाविद्यायाची मागणी वाढली. सार्वजनिक विश्वस्त म्हणून काम करणा-या स्वयंसेवी संस्थाना मोठा उत्साह दिला. शिक्षणाची चळवळच महाराष्ट्रात सुरु झाली. बौद्ध धर्म स्वीकारलेल्या दलितांना दलितांच्या सवलती तशाच चालू ठेवल्या. हजारो, लाखो मुलेमुली कित्येक पिढ्यानंतर शालेच्या प्रांगणांत बागडताना दिसू लागली. शिक्षितांच्या ज्या जगांत ज्यांना शेकडो पिढ्या कुणी प्रवेश दिला नाही, त्या जगांत डोळे उघडून हजारो लाको तरुण वावरू लागले. म. जोतिबा फुल्यांना हवा असणारा अविद्येचा निचरा करून विद्येचा प्रसार करण्यांत महाराष्ट्राने आघाडी मराली. अनेक समाजसुधारकांच्या शिकवणुकीला, चव्हाण साहेबांनी प्रतिसाद दिला.

अर्थात इथेही अडथळे आले नाहीत असं नाही. विद्येच्या मक्तेदारांनी यशवंतरावांना पेचांत धरावे म्हणून एक प्रश्न उभा केला. “एवढा शिक्षणप्रसार कशाला? यांना कुठल्या नोक-या देणार? सुशिक्षित बेकारी काय म्हणून वाढवता? या शिक्षित बेकारांच्या फौजा तुमच्याच मागे हात धुवून लागतील. तुम्हाला राज्य करू देणार नाहीत.”

चव्हाणसाहेबांनी या शंकासुरांना पुढील समर्पक उत्तर दिले.

“अशिक्षित बेकारांच्या फौजा घेऊन राज्य करण्यापेक्षा सुशिक्षित बेकारांच्या फौजा घेऊन राज्य करणे चांगले.” शिक्षण म्हणजे नोकरी एवढाच अर्थ शिक्षणाचे मक्तेदार संभावीतपणे घेत होती. यशवंतरावजी चव्हाण म्हणजे मानसिक गुलामीतून बाहेर पडण्याचा दरवाजा मानीत होते. अशिक्षित माणूस आपल्या सुखदुःखाची मिमांसा दैववादाने करीत असतो. हताश, निष्क्रीय, मृतप्राय होतो. शिक्षित मनुष्य आपल्या सुखदुःखाची कारणे परलोकांत किंवा मागच्या पुढच्या जन्मात शोधणार नाही. आपल्या अडचणीची कारणे तो या जन्मात आणि सभोवतालच्या समाज परिस्थितीत शोधील. तो इहवादी बनेल. ब्रह्मनंदी टाळी लावू, देवाची लीला म्हणून सारी दुःखे, अडचणी निपचितपणे सोसत बसणार नाही. ही जागृती हीच महत्वाची, जागृत नागरिक हाच प्रगती करील, समाजपरिवर्तन करेल, आणि अशा इहवादी जागृत नागरिकांची फौज शिक्षणातून तयार होत असेल तर ती हवीच आहे अशी चव्हाण साहेबांची भूमिका होती.

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा पेच सोडवीत आणल्यानंतर असाच कुटिल आणि कुत्सित प्रश्न काही शंकासुरांनी विचारला होता. नव्या महाराष्ट्रात राज्य मराठीचे की मराठ्यांचे होणार? राज्य सर्व मराठी भाषिकांचे होणार. मराठा जातीचे नाही.” हे उत्तर चव्हाणसाहेबांनी दिले. दुदैवाने आज राज्य मराठ्यांचे तर नाहीच पण मराठीचेही राहिले नाही. पण त्यांची कंत त्या संकासुरांना वाटत नाही. जाती जातीतील अविश्वास, दुस्वास अजूनही मनामनांत किती रेंगाळतो आहे त्याचेच हे प्रतीक आहे. काही मंडली प्रश्न उपस्थित करणे एवढेच आपले जीवनकार्य समजतात. त्या प्रश्नांना उत्तरे शोधून, ते प्रश्न सोडवण्याच्या कामात ते कुठेच दिसत नसतात. त्यासाठी करावे लागणारे श्रमसायास इतरांनीच करावेत. तसे श्रमसायास करणे हेच तर शूद्रांचे जन्मजात कर्तवय असंच ते मानतात. इंग्रजी शाळांतून आपली मुलेमुली शिकवून, परदेशी स्थायिक करून, पुन्हा मराठीच्या जागतिक परिषदा भरविण्यास आणि सोवळे नेसून सोवळ्यातील मराठीच्या दुरवस्थेबाबत गला काढून भाषणे ठोकण्यास ही मंडली सर्वापुढे असतात.

स्वायंतत्र्यानंतरचा महाराष्ट्रातील शिक्षण प्रसार ही महाराष्ट्राच्या जडणघडणीस मोठी उपयुक्त ठरणारी चळवळ आहे. दुदैवाने शिक्षण प्रसाराबरोबर शिक्षणाची उपयुक्तता व गुणवत्ता आणि शिक्षणातील समता याकडे पूर्णतः दुर्लक्षच झाले. किंबहुना इंग्रजीत राज्य चालवायला स्थानिक भाडोत्री कारकून तयार करण्यासाठी जी शिक्षणपद्धती लॉर्ड मेकॉलेने विचारपूर्वक सुरू केली होती, तीच शिक्षण व्यवस्था जशीच्या तशी वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला. शाळा कॉलेजांचा जो सांगाडा, तो आकृतीबंद, जो ढाचा इंग्रजांनी त्यांची उद्दीष्ट्ये साधण्यासाठी बनवून रूढ केला, तोच आम्ही प्रसारत नेण्याचा आंधळेपणाने खटाटोप केला. भारतीय राज्यगटनेतील निर्धारपूर्वक जाहीर केलेली उद्दीष्ट्ये व संकल्प अमलांत आणण्याची प्रतिज्ञा करून बाहेर पडणारे किती लोक या शिक्षण व्यवस्थेतून तयार होतात? याची आम्ही काहीही काळजी केली नाही. लॉर्ड मेकॉलेचे उद्दीष्ट मात्र शंभर टक्के साधून द्यायचे काम या शिक्षम व्यवस्थेने केले आहे. दिसायला हिंदुस्थानी पण आचर विचाराने विलायती असा “अँग्लोइंडियन” तयार करण्याचा उद्देश लॉर्ड मेकॉलेने जाहीर केला होता.