व्याख्यानमाला-१९९५-९६-२

व्याख्यान - दि. १२, १३, व १४ मार्च १९९५, वर्ष – २३वे

विषय - “महाराष्ट्राची जडणघडण आणि यशवंतराव”

व्याख्याते – प्राचार्य पी. बी. पाटील, सांगली

व्याख्याता परिचय -

वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील गरीब शेतकरी कुटुंबात जन्म. प्राथमिक शिक्षण जन्मगांवी, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण इस्लामपूर, सांगली व कोल्हापूर येथे.

राष्ट्रसेवादलाचे क्रियाशील कार्यकर्ते.

आचार्य जावडेकरांच्या सहवासात महाराष्ट्रातील लोकशाही, समाजवाद व सामाजिक चळवळीचे प्राथमिक धडे घेतले. राजाराम कॉलेजमध्ये अभिनेत, वक्ते, शाहीर म्हणून त्यांची विद्यार्थीदशा गाजलेली आहे. सांगली येथील नवभारत शिक्षण संस्था व शांती निकेतन लोकविद्यापीठ या संस्थेचे संस्थापक.

प्राचार्य पी. बी. पाटील हे महाराष्ट्रातील एक ध्येववादी विचारवंत, प्रभावी वक्ते, क्रियावान पंडित व पुरोगामी कार्यकर्ते म्हणून सुपरिचित आहेत. शिक्षणक्षेत्रातातील, राजकारणातील, सभासंमेलन-परिसंवादातील अभ्यास समित्यामधील त्यांचा संचार सुप्रसिद्ध आहे.

राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजविकास, शिक्षण व्यवस्था हे त्यांचे देश – विदेश अभ्यासाचे विषय.

स्पष्ट वक्ते प्राध्यापक, प्राचार्य, आमदार, प्रांतीय काँग्रेसचे सरचिटणीस, पंचायत राज्य मूल्यमापन समितीचे अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे विश्वस्त संस्थापक सरचिटणीस अशा विविध स्वरूपात प्राचार्य पी. बी. पाटील महाराष्ट्रापुढे वावरले व वावरत आहेत.