नेमका तशाच पद्धतीचा फरक यशवंतराव चव्हाण यांनी केला. हा मुद्दा समजून उमजून घेऊन चव्हाण यांनी स्वत:ला ब्राह्मण द्वेषापासून दूर ठेवले. ब्राह्मण हा देखील मनुष्य आहे. तो उच्च जातिय असला तरी त्यालाही समस्या आहेत. हे आत्मभान यशवंतराव चव्हाण यांच्याकडे होते. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांनी पानशेत धरण फुटल्यानंतर एक-दोन ब्राह्मण कुटुंबाचे नव्हे तर अनेक ब्राह्मण कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले. त्यांनी चव्हाण यांनी सरकार मार्फत मदत केली होती. चव्हाण यांनी उच्चभ्रू जातिकडून केला जाणारा जातिभेद, जातियविषमता अनुभवली होती. शिक्षणातील मराठी-संस्कृत भाषा भेद इत्यादी प्रकारची विषमता चव्हाण यांनी अनुभवली होती. जातियविषमा, जातिनिष्ठ विचार, मूलतत्त्ववाद व जमातवाद यांनी चव्हाण यांनी स्पष्टपणे नाकारले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे दुष्परिणाम त्यांनी अंत:करणातील कप्प्यात ठेवले होते. अशा उदाहरणावरून असे दिसते की चव्हाण हे चांगले-वाईट यामध्ये फरक करत होते. समाजाच्या हिताचा मुद्दा सदसदविवेक बुद्धीवर आधारित त्यांनी निवडला होता. हाच निकष त्यांनी ब्राह्मणेतर चळवळीला लावला होता. त्यामुळे चव्हाण यांनी जातीचे हित व राष्ट्राचे हित यापैकी राष्ट्रीय हिताचा मुद्दा स्वीकारला. जातीचा मुद्दा तर स्वकीयांच्या बद्दलचा होता. एवढेच नव्हे तर ब्राह्मणेतर चळवळीत त्यांच्या भावापासूनचे लोक होते. नातेसंबंधांना देखील दूर करून विवेकावर आधारिक यशवंतराव चव्हाण यांनी निर्णय घेतले. परंतु यशवंतराव चव्हाण यांनी असा फरक करत असताना सत्यशोधक चळवळीने ऐरणीवर आणलेला शिक्षणाचा व शेतक-यांचा मुद्दा सोडून दिला नाही. मागास जातीच्या राखीव जागाचा मुद्दा शाहू व गायकवाड यांनी पुढे आणलेला तो सोडून दिला नाही. याचा अर्थ यशवंतराव चव्हाणांनी सत्यशोधक-ब्राह्मणेतर चळवळीतील सत्ता, अधिकार, प्रतिष्ठा व संपत्ती-शिक्षण हे मुद्दे मात्र विचार म्हणून स्विकारले. त्यामुळे चव्हाण यांच्या वैचारिक जडणघडणीचा केंद्रबिंदू म. फुले, शाहू, शिंदे, सयजीराव गायकवाड यांचा विचार हा होता, असा निष्कर्ष रा. ना. चव्हाण यांनी काढलेला आहे.
चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय चळवळीचे सातत्य पुढे नेले. हा मुद्दा रा. ना. चव्हाण यांनी स्पष्ट केला आहे. यशवंतराव चव्हाण व लोकमान्य टिळक यांच्यामध्ये सामाजिक सुधारणेच्या मुद्द्यावर फरक दिसतो. लोकमत विरोधात जाईल या मुद्यावर टिळक सुधारणांच्या बाजूला जात नव्हते. मात्र चव्हाण यांनी लोकमताचा विचार न करता अल्पमतामध्ये येऊन राखीव जागा व शिक्षणाचा मुद्दा लावून धरला होता हे आपण वर पाहिलेच आहे. स्वराज्य, राजकारण, सत्ताकारण यांच्यासाठी चव्हाण कोणतेही साधन वापरत नव्हते. या मुद्द्यावर चव्हाम हे टिळकांच्या विचारांपासून अलिप्त दिसतात. टिळक हे साधनाम अनेकतावादी होते. कोणतेही साधन टिळक योग्य मानत होते. चव्हाण मात्र लोकशाही, पक्षशिस्त व नीतीमूल्य मानणारे होते. याअर्थाने चव्हाण टिळकांपेक्षा वेगळे दिसतात. किंबहुना चव्हाण साधनसूचिता पाळणारे होते. त्यामुळे चव्हाणांची वैचारिक पंरपरा ही रा. ना. चव्हाण यांनी स्पष्ट केलेली म. फुले-शाहू-शिंदे-सयाजीराव गायकवाड यांची होती.