आमचे मुख्यमंत्री -४१

निजामाच्या विरुध्द चळवळीत भाग घेतला. महाराष्ट्रातील अनेक जलप्रकल्प पूर्ण केले. मिझोराम, काश्मिर, पंजाब आणि बाबरी मशीद हे राष्ट्रीय स्तरावरील प्रश्न त्यांनी अतिशय कुशलतेने हाताळले. राज्यस्तरावरही त्यांनी विविध क्षेत्रांत कार्य केले. यशवंतराव चव्हाणांनंतर शंकररावच शासकीय यंत्रणेत जास्त काळ राहिले.

शंकरराव चव्हाण हे सात्विक व निष्कलंक चारित्र्याचे व्यक्तिमत्व. त्यांची राहणी व चारित्र्य इतके स्वच्छ होते की मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना मुंबईत राहण्यास जागा नव्हती! त्यांनी स्वतःचा पंथ व पक्ष काढला नाही. त्यांनी लोककल्याणाकरता सत्ता वापरली. त्यांचा दृष्टिकोन निरपेक्ष होता. ते एक कार्यक्षम, कर्तृत्ववान, निःस्वार्थी व्यक्तिमत्व होते. ते मितभाषणी, मितआहारी होते. परंतु शंकररावांकडे सातत्याने माणसे जोडण्याचे कसब नव्हते. ते स्पष्टवक्ते होते व ध्येयवादी असल्यामुळे तत्वाबाबत तडजोड करीत नसत. एका दृष्टीने त्यांचे थोडेसे ह्याबाबतीत मोरारजींशी साम्य आहे. त्यामुळे त्यांना पक्षात व बाहेर अनेक शत्रू होते. परंतु ते महाराष्ट्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते व महाराष्ट्राला ते मंत्री म्हणून लाभले हा सुयोगच म्हणावा लागेल.

संदर्भग्रंथः

१)    सावंत सुरेश – महाराष्ट्राचे शिल्पकार शंकरराव चव्हाण, जुलै २००६, म.रा.सा.सं.मंडळ.
२)    उत्तम सावंत – शंकररावांचे जीवनकार्य, २०००, निर्मल प्रकाशन, नांदेड.
३)    वि.स.वाळिंबे – शंकरराव चव्हाण, १९७६, प्रकाशक इंडिया बुक कं., पुणे ३०.
४)    चंद्रशेखर वाह – शंकरराव चव्हाण, प्रकाशक केशव भिकाजी ढवळे.
५)    सौ. कुसुमताई शं. चव्हाण – कुसुमांजली, शब्दांकन सुरेश ठाकूर, १९९४, प्रकाशन जयंत
       हिरालाल शहा, पुणे ४११ ०३७.
६)    श्री. गाडे – शंकरराव चव्हाण, जाने. २००२, अविष्कार प्रकाशन, पुणे
७)    पंढरीनाथ पाटील – लोकानुवर्ती राज्यकर्ता शंकररावजी चव्हाण, प्रकाशक सौ. आशादेवी
       पंढरीनाथ पाटील, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१.
८)    सुधीर भोंगळे – पाणीदार, २६-२-२००५, सुज्ञान प्रकाशन, पुणे ३८.
९)    इंडिया टुडे – मार्च १९८६.