१९६० - ऑक्टोबर २१, पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे जाहीर सत्कार,
१९६० - नोव्हेंबर, अखिल भारतीय काँग्रेस निवडणूक मंडळावर निवड.
१९६० - नोव्हेंबर १०, नागपूर करार अंमलबजावणीचा भाग म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूरात दरवर्षी भरविण्यात सुरुवात.
१९६० - डिसेंबर २१, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना व नागपूर येथे मंडळाचे उद्घाटन.
१९६० - डिसेंबर, मुंबई येथे शिवछत्रपतींच्या पुतळयाचे अनावरण.
१९६१ - जानेवारी, काँग्रेस महासमितीमधून निवडणूक पद्धतीने प्रथमच झालेल्या निवडीत वर्किंग कमिटीवर निवड.
१९६१ - दिल्ली येथे भरलेल्या ४३ व्या अ.भा.मराठी नाटय संमेलनाचे स्वागताध्यक्ष.
१९६१ - मार्च ३०, विदर्भातील जनतेच्या वतीने नागपूर येथे ४७ व्या वाढविदसानिमित्त सत्कार समारंभ.
१९६२ - मे १, पंचायत राज्य योजनेचा प्रारंभ.
१९६२ - सातारा येथे भरलेल्या अ.भा.म. साहित्य संमेलनाचे उद्घाटक.
१९६२ - फेब्रुवारी, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका, काँग्रेसने २६५ पैकी २१४ जागा जिंकून प्रचंड विजय मिळविला.
१९६२ - ऑक्टोबर, 'केसरी' च्या दिवाळी अंकात 'नियतीचा हात' हा पहिला लेख प्रसिद्ध.
१९६२ - नोव्हेंबर २२, भारताचे संरक्षणमंत्री म्हणून सूत्रग्रहण.
१९६३ - नाशिक जिल्ह्यामधून लोकसभेवर बिनविरोध निवड.