भाग १ विधानसभेतील भाषणे-९४

The general basis of the principles seems to me to be not to mix election and official tours...An official tour can, however, be terminated at a convenient point and election tour started from that point. Travelling allowance should not be claimed for election tours of political or other non-official work. A point that was raised in this connection when we discussed that question on Wednesday was whether travelling allowance can be claimed for returning for official work from an election tour. This point seems to have been answered in the Office Memorandum No. 18/45/51 Public, dated the 13th December 1951 from the Government of India, Ministry of Home Affairs, which is in the accompaniments in this letter.

Another point made in the letters is not to use official machinery during election tours. This would include use of cars whether allotted to you or any other Government car, meeting of officials on arrival or at functions, police escort, etc. Police can and will provide such attendance as may be considered necessary by them for the purpose of protecting the Ministers.

I think it is also desirable that a Minister or Deputy Minister should not participate during his period in a formal official function like laying of a foundation stone, opening ceremony etc. irrespective of, whether such function is held in his constituency or not, as such a function is to be regarded as election propaganda and will put officials in an embarrasing position."

त्यासंबंधी लीगल इंटरप्रिटेशन पाठविले होते त्यावर हे आधारलेले आहे.
"As informally decided by us we would all ensure that decision regarding functions, etc., as mentioned in the above paragraphs is strictly observed from 25th December 1961 till the General Elections are over."

दोन महिन्यांचा हा काळ ठेवलेला आहे. साधारण इलेक्शनपूर्वी एक महिना आणि इलेक्शननंतर एक महिना. २५ डिसेंबरपासून हे अंमलात आणावयाचे ठरविण्यात आले आहे. आणि त्याच हेतूने सर्व मंत्री व उपमंत्री ह्यांच्याकडे हे पत्र पाठविण्यात आले आहे.

मला या ठिकाणी एवढेच सांगावयाचे आहे की, आपण ज्या हेतूने येथे हा प्रश्न उपस्थित केलेला आहे तो हेतू लक्षात घेऊन त्याबाबतची उपाययोजना आम्ही आधीच केलेली आहे. आणि आम्ही काय केले हे मी ह्या सभागृहाला सांगितले आहे. आता यापेक्षा आणखी मी काय सांगू? आणखी या प्रश्नाबाबत तपशिलात जाण्याची माझी इच्छा नाही. आणि जास्त तपशिलात जाऊन मला येथे टेंपो वाढविण्याची इच्छा नाही. माझी अशी अपेक्षा होती की, इलेक्शनच्या वेळी या दृष्टीने काय उपाययोजना करावी यासंबंधी काही विधायक स्वरूपाच्या सूचना येथे करण्यात येतील. परंतु तसे काही करण्यात आले नाही. समजा, एखाद्याने एखादी गोष्ट चुकीची केली तर त्याबद्दल ह्या अधिकार्‍याला किंवा व्यक्तीला समज देणे आवश्यक असते आणि चुकीच्या गोष्टी पुन्हा होऊ नयेत म्हणून बरेच वेळा शासन करणेही आवश्यक असते, आणि अशा गोष्टी शासनाच्या नजरेला आणल्या पाहिजेत. ज्या गोष्टी आपल्याला चुकीच्या वाटतात त्याबद्दल टीका करण्याचा सदस्यांचा अधिकारच आहे असे मी मानतो. श्री.म्हाळगी यांनी आपल्या भाषणात एक तक्रार केली की मी पौड येथे गेलो असताना सभेच्या जागी लोकांना आणण्यासाठी पी.डब्ल्यु.डी.च्या ट्रक्स वापरण्यात आल्या. मला असा खुलासा करावयाचा आहे की, तेथे पी.डब्ल्यु.डी.च्या गाडया वापरण्यात आल्या नाहीत. ह्या बाबतीत माझ्याकडे अशी तक्रार आली होती की, काही खाजगी माल ट्रक्स, आवश्यक ती परवानगी न घेता माणसे आणण्यासाठी वापरण्यात आल्या.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org