भाग १ विधानसभेतील भाषणे-७१

परंतु मला येथे स्पष्टपणे असे सांगावयाचे आहे की आमच्या मनगटात शक्ती आहे. जर तो आणखी काही करू म्हणत असेल तर आम्ही त्याला खेचून घेऊन, पुढे जाऊ देणार नाही. कम्युनिस्ट थोडया संकोचाने या बाबतीत बोलतात, असे मला वाटते. त्यातदेखील पुष्कळशी चांगली माणसे आहेत. परंतु त्यांच्या काही अडचणी आहेत, हे आम्ही समजू शकतो. परंतु काय करतील बिचारे. त्यांनी साफ सांगितले पाहिजे, चीनचा चौ असो किंवा आणखी कोणी असो, तो जर इकडे वाकडया डोळयांनी पाहील तर त्याने लक्षात ठेवावे, आमची नजर घारीप्रमाणे तीक्ष्ण आहे. आम्ही त्याला ताबडतोब ठेचून टाकू. यामुळे काय होते, नेगेटीव्ह अँक्टिव्हिटीजदेखील चुकीच्या मार्गांवर जातात. आयसेनहॉवरचा काळ असता तर तसे घडले असते. परंतु मला येथे देखील म्हणावेसे वाटते की, अँटी कम्युनिस्ट आणि अँटी मुस्लिम अँटिटयुडने एक प्रकारचे फुटीरतेचे विचार निर्माण होतात. मी असे म्हणतो की, नेहमी पॉजिटिव्ह विचारसरणी घ्यावयाला पाहिजे. हिंदुस्थानच्या राष्ट्रैक्यावर संकट आले तर कुठलीही शक्ती काम करू शकणार नाही,  म्हणून आपण राष्ट्रीय ऐक्याची जोपासना केली पाहिजे, आणि आत्मविश्वास जागृत ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिंदुस्थानातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये जबरदस्त सामर्थ्य आहे. ब्रिटिशांच्या काळामध्ये देखील आमच्यात एकतेची भावना होती आणि त्यामुळेच आम्ही एका प्रबळ राष्ट्राचा विरोध करू शकलो. म्हणून या लहानसहान गोष्टीकरिता आपणाला मुळीच घाबरण्याचे कारण नाही. प्रत्येक बाबीचा सारासार विचार झाला पाहिजे, मग ते कम्युनिस्ट असोत, किंवा मुसलमान असोत जर कोणी राष्ट्रविरोधी कृत्य करण्याचा प्रयत्न करील तर त्याला तेथल्या तेथेच दाबले जाईल, अशा प्रकारची आत्मविश्वासाची भावना सबंध जनतेच्या मनात जागृत करावयाला पाहिजे आणि तसा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असा मला विश्वास आहे.
--------------------------------------------------------------------------
On 16th  March, 1961, Shri Y. B. Chavan, Chief Minister, expressed his views on a neccessity to put the check to anti-social activities. He said that though this House had spent two hours discussing this issue, nothing had happened that would endanger nationalism. Referring to the incident in Satara, he said that it was a very casual incident and no communal elements were involved in it. He added that branding the Muslims as anti-national would result in hatred. He stressed that frustration among the Muslims should be removed at all costs.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org