भाग १ विधानसभेतील भाषणे-४४

अध्यक्ष महाराज, दुसरी गोष्ट अशी की, त्या ठिकाणी हजर असलेल्या प्रमुख अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतर शांततेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे याची खात्री पटल्यानंतरच लाठीमाराचा हुकूम दिला. यामध्ये नगरपालिकेच्या लोकशाही अधिकारांचे रक्षण व्हावे ही भावना होती. त्यामुळे जे काही त्या ठिकाणी पोलिसांना करावे लागले ते लोकशाहीच्या संरक्षणासाठीच करावे लागले असल्यामुळे विरोधी पक्षाची टीका मी स्वीकारू शकत नाही. कोणताही लहानसहान प्रश्न निर्माण झाला की चौकशी झाली पाहिजे अशी हाकाटी केली जाते. चौकशी करण्यायोग्य गोष्ट असेल तर चौकशी जरूर झाली पाहिजे. परंतु या प्रकरणाची मी व्यक्तिशः लक्ष घालून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या माहितीवरून मी असे खात्रीपूर्वक सांगू शकतो की या सर्व घटनेमध्ये पोलिसांकडून कोणतीही चूक झालेली नाही. या सर्व दुर्घटनेला जबाबदार कोण असतील तर ही करविरोधी चळवळ ज्यांनी चुकीच्या मार्गांनी नेली ते नेते याला जबाबदार आहेत. सरकार याला मुळीच जबाबदार नाही. या दुर्घटनेमध्ये ज्यांना मार खावा लागला त्यांना त्याचा जाब विचारायचा असेल तर त्यांनी या नेत्यांना तो विचारावा असे मी म्हणेन.

लोकशाही चळवळीला सरकारचा विरोध नाही आणि त्यामध्ये पोलीस अडथळेही आणणार नाहीत. आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकसारख्या सात दिवस सभा होत होत्या. मिरवणुका काढल्या जात होत्या, घोषणा होत होत्या, परंतु पोलिसांनी त्यामध्ये व्यत्यय आणला नाही. उलट, या चळवळीमध्ये कोणीही अडथळे आणू नयेत या दृष्टीने त्यांना मदत केली. याचा अर्थच असा की, विरोधी पक्षाचा कोणत्याही गोष्टीविरुद्ध सनदशीर चळवळ करण्याचा हक्क कायम ठेवला पाहिजे आणि त्या हक्काला संरक्षण दिले पाहिजे हीच आमची भावना आहे. परंतु विरोधकांचा विरोध लोकशाहीच्या विशिष्ट मर्यादेबाहेर जाऊ लागला आहे असे दिसले तर मात्र पोलिसांना त्या ठिकाणी येऊन आपले कर्तव्य पार पाडावे लागते. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आपले कर्तव्य योग्य वेळी आणि योग्य रीतीने पार पाडले आहे असे माझे स्पष्ट मत असल्यामुळे या ठिकाणी जी टीका करण्यात आली ती मी स्वीकारू शकत नाही.
----------------------------------------------------------------------------
Justifying the lathi charge at Akola on 3rd March,1958, Shri Y.B.Chavan, Chief Minister, Said that the Opposition parties and the Anti-Octroi Duty Conference deliberately created the situation in which the lathi charge was inevitable. He said that his Government was not opposed to the Octroi Duty because for many Corporations it was a source of maximum income and so the problem could be sorted out only through its consent. He added that the tension was mounting up for eight days prior to 3rd March on which day the meeting of the corporation held the Octroi Duty Schedule. With the intention of making it impossible to prepare the Schedule, about 200-300 demonstrators rushed in; they were driven out by the Police later. He accused the Opposition of taking undue advantage of popular resentment.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org