भाग १ विधानसभेतील भाषणे-११२

एका सन्माननीय सभासदांनी सोलापूरचे उदाहरण सांगितले. वृत्तपत्रामध्ये ते सर्व प्रकरण आलेले आहे परंतु ज्याला आपण सबज्युडिस म्हणजे न्यायप्रविष्ट म्हणतो असे हे प्रकरण आहे. त्या बाबतीत पोलिस इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. ह्या बाबतीत मला काही माहिती मिळाली तर मी पाहीन आणि त्यातील काही मंडळींनी रिप्रेझेंटेशन दिले किंवा गार्‍हाणी दिली तर त्या बाबतीत मी चौकशी करीन. ह्यामध्ये कोण काँग्रेसचे होते आणि कोण काँग्रेसचे नव्हते हा प्रश्न नाही. जे काँग्रेसच्या बाहेर होते त्यांना त्रास दिला जातो आणि आत येणारांना प्रवेश दिला जातो व त्रास होत नाही असे समजण्याचे कारण नाही. मी कोणत्या अर्थाने हे बालतो ते सन्माननीय सभासदांनी लक्षात घ्यावे. ज्याअर्थी आम्ही लोकशाहीचे तत्त्व स्वीकारले आहे त्या अर्थी एक गोष्ट उघड आहे की, त्या लोकशाहीच्या तत्त्वाप्रमाणे मतांतर करण्याचे आणि मत बदलण्याचे स्वातंत्र्य असावे. एकदा जे मत बनले ते कायमचे मत असे जर आपण म्हणू लागलो तर ह्या सरकारला कायमच राज्यावर बसावे लागणार आहे. तशी माझी इच्छा नाही. मी असे म्हणतो की, ज्यांनी आम्हाला मते दिली त्यांचे देखील मतांतर होईल आणि समोरच्या मंडळींना ज्यांनी मते दिली त्यांचे देखील मतांतर होईल. मतांतर हा लोकशाहीच्या कल्पनेचा आत्मा आहे. कोण कोण काँग्रेसमध्ये आले आणि कोण बाहेर गेले याला महत्त्व नाही. कदाचित् आज जे काँग्रेसच्या बाहेर असतील ते देखील उद्या काँग्रेसमध्ये येतील पण त्यासाठी पोलिसांची मदत घेण्याचा विचार नाही. तेव्हा ह्या प्रकरणाबाबत पोलिस इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तोपर्यंत निराळया रीतीने इन्व्हेस्टिगेशन करता येणार नाही. पाहिजे तर दुसर्‍या चांगल्या माणसाकडून इन्व्हेस्टिगेशन करून घेता येईल. अध्यक्ष महाराज, मला आपण थोडा जास्त वेळ दिला याबद्दल मी आपला आभारी आहे. ह्या मागणीच्या चर्चेमध्ये जे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते त्यातील सर्वसामान्य मुद्यांना मी उत्तर दिलेले आहे. तपशिलाबाबत काही सांगितले तर मी अधिक चौकशी करीन. तेव्हा सभागृहासमोर जी मागणी आहे ती मंजूर व्हावी अशी मी सभागृहाला विनंती करतो.
----------------------------------------------------------------------------
On 3rd July 1962, while getting sanction of the House for the demands for the Police department, Shri Y. B. Chavan, Chief Minister, explained Government’s policy about the Police Department. He admitted that there was an increase in the number of crimes, which influenced their detection, accidents and consequent expenditure on Police. He said that crimes and accidents were the result of ever increasing population in cities like Bombay. He further said, that prohibition crimes, which took much of the time of the Police could be checked only by educating the people. He emphasised that corruption was a tendency which could be eradicated by increasing emoluments. He added that the Government had appointed the Police Commission to look into their problems and was doing everything possible to solve them. Nevertheless, he maintained that trade unionism in the police department could never be tolerated.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org