व्याख्यानमाला-१९९५-९६-५०

तीन कोटी रेड इंडियन आदिवासींचे रक्त सांडून विशाल अमेरिकेचा कब्जा केला, पण ती भूमी कसायची कुणी? त्यासाठी मजूर कुठले? आफ्रिकेतील एका मिशन-याने कल्पना सुचविली. आफ्रिकेतील निग्रो पकडून गुलाम म्हणून अमेरिकेत विकायचे, आणि तेथील प्रचंड मळे कसायचे. कल्पना एकदम पसंत पडली. मग मासे झिंगे पकडायला जसे कोळी, भोई जातात, तसे निग्रोना पकडायला युरोपीयन कंपन्या तयार झाल्या. सुरुवातीचे स्पेन पोर्तुगाल मागे पडले. गुलामांचा व्यापार बरकतीला आणला. इंग्लिश व्यापा-यांनी बोटी भरभरून आफ्रिकेतील निग्रो अमेरिकेत नेऊन विकले. प्रचंड फायद्याचा व्यापार झाला. किती निग्रोंना पकडे? आणि किती निग्रां गेल्या तीनशे वर्षात अमेरिकेत नेऊन विकले? ते पुस्तक म्हणते, ५ कोटी निग्रोंचा व्यापार झाला, अमेरिकेत मात्र तीन कोटी गुलाम पोचले. बाकीचे दोन कोटी कुठे गेले? मासे, झिंगे भरावेत तसे निग्रो बोटीत भरल्याने ते वाटेतच मेले. त्यांची प्रेते बोटीतून समुद्रांत फेकून देण्यात आली.

तीन कोटी रेड इंडियन्स आणि पाच कोटी निग्रो यांच्या रक्ताने, घामाने आणि अश्रूने भिजलेली अनेरिकन भूमी आज त्या अत्याचा-यांच्या मालकीची आहे. सोन्याच्या राशीवर आता बसलेत आणि तेथून “मानवी हक्क, अतिरेक्यांचा निषेध, न्याय, स्वातंत्र्य, लोकशाही अशा मूल्यांच्या घोषणा करीत आहेत.

युरोपीयनांनी ऑस्ट्रेलियातील मावरी आदिवासी असेच मारून टाकले आणि त्या खंडावर गेल्या दोनतीनशे वर्षांत कब्जा केला. न्युझीलंडमध्ये मानरून, जाळूनही संपेनात निरपराधी आदिवासी माणसे मारण्याचा नॉसिया काही युरोपीयन सैनिकांना आला. तशी त्यांनी घरी पाठविलेली पत्रे आहेत. मग मिशन-यांनी माणसे मारण्याची नवी कल्पना काढली. प्रभूसेवा करण्यासाठी गेलेल्या न्युझीलंड मधल्या इंग्लिश मिशन-याने आदिवासी मावरीना कपडे, घोंगडी, रग्ज वाटल्या. पण त्या वाटताना त्यांत प्लेगचे व हिवतापाचे जंतू भरले आणि त्या भयानक रोगांच्या साथी फैलावून हजारो लाखो मावरी मारले.

पहिल्या महायुद्धापर्यंत सा-या पॅसिफीक महासागरातील लहान मोठी सारी वेटे, प्रदेश असे “साफ व सेफ” करून या अमेरिकन युरोपीयनांनी आपल्या कब्जांत घेतली. त्यानंतर फिलीपाईन्समध्ये असाच कत्तलखाना चालवला. न्यूयॉर्कमध्ये मात्र स्वातंत्र्यदेवीचे भजन, पूजन चालू ठेवले. पहिले, दुसरे महायुद्ध या पांढ-या राक्षसांनी आपसातच केले. त्यात तीन कोटी माणसे मारली. जपानवर अणुबाँब टाकले. दोन मोठी शहरे बेचिराक केली. युद्ध संपले तरी कोरियांत भांडण लावले. व्हिएटमानमध्ये कार्पेट बॉबिंग केले. मध्य आशियात अस्त्रायल राष्ट्र जबरदस्तीने उभे करून तिथल्या पैलेस्टाईन रहिवाश्यांना देशोधडीला लावले. अमेरिकेच्या संयुक्त राज्यात इस्त्राइल हे अमेरिकेचे ५२वे घटक राज्य आहे. आफ्रिकेत नवोदित राष्ट्रात कायम टोळीयुद्धे चालतील अशी व्यवस्था केली. माघारी निघालेल्या इराकी फौजावर विमानातून बाँब हल्ले करून माणसे मारण्याची आपली सवय अमेरिकेने विझू दिली नाही.

आजही जगांत कुठे ना कुठेतरी युद्धे धुमसत ठेवायची. लढणा-या दोन्ही बाजूला शस्त्रे पुरवायची, हे अमेरिकेचे, फ्रान्सचे, इंग्लंडचे आणि रशियाचे अधिकृत धोरण आहे. या देशांत शस्त्रास्त्र निर्मितीचे कारखाने फायद्यांत चालले पाहिजेत म्हणून या कत्तली चालूच राहिल्या पाहिजेत. अशी धोरणे युरोपीयन लोक फार “मुत्सद्दीपणाने” अमलात आणीत आहेत. युनोसारख्या जागतिक संघटना आपल्या हेतुपूर्तीसाठी वापरीत आहेत. जगाच्या पाठीवर काही दंगली, हिंसाचार, लढाय वा युद्ध झाले तर, लढणा-या दोन पार्टीना जितके जबाबदार धरले जात तसे त्यांच्या हातात ज्यांची कुणाची शस्त्रे असतील, ती शस्त्रे निर्माण करणा-या देशांनाही तितकेच जबाबदार धरले पाहिजे.

 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org