व्याख्यानमाला-१९८९-३३

९. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व स्त्रियांस अथवा पुरुषांस एकंदर सर्व मानवी हक्काविषयी आपले पाहिजेल तसे विचार, आपली पाहिजेल तशी मते बोलून दाखविण्यास, लिहिण्यास आणि प्रसिद्ध करण्यास स्वतंत्रता दिली आहे. परंतु ज्या विचारांपासून व मतांपासून कोणत्याही व्यक्तीचे कोणत्याच त-हेचे नुकसान मात्र होऊ नये म्हणून जे खबरदारी ठेवितात, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

१०. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्यांच्या व्यवस्थेवरुन एकंदर जे सर्व स्त्री-पुरुष दुस-याच्या धर्मासंबंधी मतांवरुन अथवा राजकीयसंबंधी मतांवरुन त्यास कोणत्याही प्रकारे नीच मानून त्यांचा छळ करीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

११. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुषांस एकंदर धर्मासंबधी गांवकी अथवा मुलकी अधिकाराच्या जागा त्यांच्या योग्यतेनुरूप व सामर्थ्यानुरुप मिळाव्यात, म्हणून त्यास समर्थ केले आहेत असे कबूल करणारे त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

१२.  आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्यांच्या नियमास अनुसरून एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुष धर्म, गांवकी व मुलकी यासंबधीची प्रत्येक मानवाची स्वतंत्रता, मालमत्ता, सरक्षण आणि त्याचा जुलमापासून बचाव करण्याविषयी जे कोणी बाध आणीत नाहीत. त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

१३. स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या मातापित्याचा वृद्धापकाळी परामर्ष करुन इतर मानववृद्ध शिष्टांस सन्मान देतात, अथवा मातापित्याचा परामर्ष करुन इतर मानववृद्ध शिष्टांस सन्मान देणारांस बहुमान देतात, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

१४. स्त्री अथवा पुरुष जे वैद्यांच्या आज्ञेवाचून अफू, भांग, मद्य वगैरे अमली पदार्थांचे सेवन करुन नाना त-हेचे  अन्याय करण्यास प्रवृत्त होत नाहीत, अथवा ते सेवन करणारास आश्रय देत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

१५. स्त्री अथवा पुरुष, जे पिसू , ढेकूण, ऊं वगैरे कीटक, विचू, सरपटणारे सर्प, वाघ, सिंह, लांडगे वगैरे आणि त्याचप्रमाणे लोभी मानव दुस-या मानव प्राण्याचा वर्ध करणारे किंवा आत्महत्या करणारे खेरीजकरुन जे स्त्री अथवा पुरुष दुस-या मानव प्राण्यांची हत्त्या करीत नाहीत अथवा हत्त्या करणारास मदत देत नाहीत त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

१६. स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या हितासाठी दुस-याचे नुकसान करण्याकरिता लबाड बोलत नाहीत अथवा लबाड बोलणारास मदत करीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

१७. स्त्री अथवा पुरुष, जे व्यभिचार करीत नाहीत अथवा व्यभिचा-यांचा सन्मान ठेवीत नाहीत. त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

१८. स्त्री अथवा पुरुष, जे हरएक प्रकारची चोरी करत नाहीत अथवा चोरास मदत करीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

१९. स्त्री अथवा पुरुष, जे द्वेषाने दुस-याच्या घरास व त्यांच्या पदार्थास आग लावीत नाहीत अथवा आग लावणा-यांचा स्नेह करीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

२०. स्त्री अथवा पुरुष, जे एकंदर सर्व जगाच्या हितासाठी धर्मपुस्तक तयार केले आहे, म्हणून मोठ्या बढाईने वाचाळपणा करितात परंतु ते धर्मपुस्तक आपल्या बगलेत मारुन इतर मानवास दाखविता नाहीत, अशा कपटी बढाईखोरांवर जे विश्वास ठेवित नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org