व्याख्यानमाला-१९८९-२८

१. १८४८ साली पुण्यात बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात मुलींची शाळा सुरु केली. भारतीयांनी ही सुरु केलेली पहिली मुलींची शाळा होती.

२. पत्नीला शिकवून स्त्री शिक्षण दिले. सावित्रीबाई फुले भारतीय पहिली स्त्री शिक्षिका आहे.

३. १८५१ साली अस्पृश्य मुलांच्यासाठी भारतीय पातळीवरील भारतीय गृहस्थानी काढलेली पहिली शाळा जोतिराव फुले यांनी काढली.

४. त्यांच्या वडिलांनी त्यांनी मुलींची शाळा सुरु केल्याबद्दल १८९४ मध्ये त्यांना घराबाहेर काढले तरी शिक्षण खुले करण्याचे कार्य त्यांनी सोडलेले नव्हते.

५. १८५१ साली स्वत:च्या घरातील हौद व विहीर अस्पृश्यांसाठी पाणी पिण्यासाठी मोकळा केला.

६. विधवा विवाहाचा पुरस्कार करुन १८६४ साली पुण्यात गोखल्यांच्या बागेत रघुनाथ जनार्दन व नर्मदा यांचा पुनर्विवाह लावून दिला.

७. विधवेचे वाकडे पाऊल पडून जन्माला आलेले मूल सांभाळण्यासाठी 'अनाथगृह' १८६३ साली त्यांनी स्थापन केले.

८. १८६५ साली काशिबाई नामक ब्राह्मण विधवेला आश्रय दिला. तिची प्रसूती गुप्तपणे घडविली तेव्हा स्वत: सावित्रीबाई फुले यांनी मुलाची नाळ कापली. काशिबाईचा हा मुलगा 'यशवंत' यालाच पुढे स्वत:चा दत्तक पुत्र म्हणून जोतिरावाने घेतले.

९. जोतिराव फुले यांनी बालविवाहाला खंबीर विरोध केला.

१०. १८६८ साली रायगडावर जाऊन शिवाजी राजांच्या समाधीचा शोध लावला.

११. १८७३ साली धर्ममूलक विषमता तोडण्यासाठी आणि सत्याचा धर्म पुरस्कारण्यासाठी सत्यशोधक समाज स्थापन केला.

१२. विधवांचे केशवपन अर्थात मुंडण ही विशेषत: ब्राह्मण समाजातील क्रू चाल बंद पाडण्यासाठी नाव्ह्यांचा संप आणि बहिष्कार त्यांनी घडवून आणला.

१३. गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, जातिभेद विवेकसार, सार्वजनिक सत्यधर्म, सत्सार, अखंड, शेतक-यांचा आसूड आदि ग्रंथ लिहून धर्मातील जे जे हिणकस, ते ते जाळून टाकले पाहिजे आणि धर्माला शुद्ध स्वरुप प्राप्त करुन दिले पाहिजे यासाठी ते झटले.

१४. लग्न समारंभात वधूवरांना न कळणारे संस्कृत मंत्र म्हणण्याऐवजी आपल्या मातृभाषेत ईश्वराची आराधना करावी असे सांगून लग्न-विधीसाठी सत्यशोधक मराठी मंगलाष्टके त्यांनी रचली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org