व्याख्यानमाला-१९८७-२ (19)

धर्म आणि नीती
नीती हा शब्दच ‘नी’  या धातुपासून बनलेला आहे. ‘नी’ म्हणजे घेऊन जाणे अथवा वाहून नेणे. जी आपमास नेईल, आयुष्याच्या मार्गावरून नीट घेऊन जाईल अथवा वाहून नेईल ती नीती होय. नीतीला इंग्रजीत मॉरॅलिटी असा शब्द आहे. हा Morality  शब्द Mores या लॅटीन भाषेतील अनेकवचनी शब्दापासून बनला आहे. Mores  म्हणजे कोणत्याही समाजात प्रस्थापित झालेल्या व त्या समाजास मान्य असलेल्या चालीरीती अगर वागणूकीच्या रीती होत. जगातली सारी नीती ही समाजसापेक्ष आहे. समाजधारणेच्या आवश्यकतेतून ज्या रूढी समाजाने स्वीकारल्या त्याच पुढे धर्माने मान्य केल्या आणि त्याचे नीतीत रूपांतर झाले. त्यामुळेच समाज जसजसा बदलत गेला तशी त्याची नीतीही बदलत गेली. यहुदी ख्रिस्ती नीतीशास्त्र हे मानव आणि देव यांचा संवादी संबंध साधणारे नीतीशास्त्र आहे. देवाची कृपा संपादन करणारे वर्तन म्हणजे योग्य व शुध्द वर्तन होय असा मुलभूत सिध्दांन्त त्यात प्रस्थापित केलेला आहे.
 
जगातील सर्वच धर्मांची नीती ही थोड्याफार फरकाने त्या प्रत्येकाच्या देवशास्त्रावर, थिआँलॉजीवर आधारलेली होती. परमेश्वराचे अस्तित्व, त्याचे स्वरूप, त्याचे अवतार, त्याचे पुत्र किंवा दुत त्यांनी केलेले चमत्कार, त्यांना प्राप्त झालेले देवपम यावर या धर्मनीतीची मदार होती. परंतु विज्ञानाची जसजशी प्रगती होत गेली तसतशा या सा-या गोष्टी विचारी माणसाला भाकडकथा वाटू लागल्या. नव्या समाजधारणेसाठी त्यांना नीतीची तर आवश्यकता होतीच परंतु या नीतीला धर्माच्या तुरंगातून स्वतंत्र करणे त्यांना आवश्यक वाटत होते. वज्ञानाच्या प्रगतीने सा-या धर्मसकल्पनानांच आव्हान दिले. ख्रिस्ती धर्माने सांगितलेली पृथ्वी कल्पना आणि आपल्या पुराणांनी शेषाच्या फडीवर उभ्या केलेल्या पृथ्वीच्या कल्पनेला कोपर्निकस आणि गॅलीलीओने बाद करून टाकले. पृथ्वीची आणि माणसाची निर्मिती परमेश्वराने केली, अँडम आणि इव्ह यांचा जन्म शुक्रवारी झाला कारण शनिवारी परमेश्वराने विश्रांती घेतली ही ख्रिस्ती धर्मश्रध्दा डार्विनच्या उत्क्रांतीवादाने खोडून काढली. पृथ्वीवर जीव निर्माण झाल्यापासून मनुष्यप्राणी निर्माण होईपर्यत बराच कालावधी लोटला आहे. या डार्विनच्या म्हणण्याने धर्माने सांगितलेली उत्पत्ती कोलमडली.  ‘निसर्गाच्या निवडीची’ प्रक्रिया चालू राहिल्यामुळे प्राणीमात्र भोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेतात या डार्विनच्या निरीक्षणाने परमेश्वर आणि त्याच्या द्याळूपणाबद्दल जे अंध:श्रध्दे युक्तीवाद रूढ होते त्यांना सोडचिठ्ठी मिळाली आणि माणूस हा विकास पावलेला प्राणी आहे. त्याची उत्पत्ती माकडापासून झाली हे सांगून डार्विनने सारेच धर्म खिळखिळे करून टाकले. या वैज्ञानिकांना धर्मपीठांनी फार त्रास दिला. त्याचा इतिहास सांगायला वेळ नाही तो रसेलने विस्ताराने सांगितला आहे. धर्मपीठांनी विज्ञानाविरूध्द युध्द केले. त्यावर दडपणे आणली. अमेरिकेसारख्या प्रगत देशात सुध्दा या विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत डार्विनचा उत्क्रांतीवाद तिच्या टेनेसीराज्यात शिकवायला कायद्याने बंदी होती. कारण तो ‘परमेश्वरी वचनांच्या विरूध्द’ होता. अणू विभाजन होऊ शकते. नागासाकी आणि हिरोशिमा बेचिराख करून अमेरिकेने दुस-या महायुध्दात हे सिध्दही केले होते परंतु आपली विद्यापीठे तरीही अणू हा सनातन आणि अविभाज्य आहे असेच शिकवीत होती ना ? कां ? कारण त्यांना आपल्या ब्रह्म तत्वाची भीती वाटत असावी. हे मानले तर ब्रह्मही विभाजीत होईल की काय या भीतीने आपल्या शिक्षणतज्ञांच्या उरांत धडकी भरली होती. अणूचे विभाजन होते हा शास्त्रीय विचार शिकवायला आपणही कमी वेळ घेतलेला नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org