व्याख्यानमाला-१९७९-५६

शेवटी हे भाषण संपवायच्या आधी एका फक्त एक गोष्ट सांगवयाची आहे. की मी आता जे चित्र आपल्यापुढं उभं केल ते आपल्याला निराश करण्यासाठी उभं नाही केलं, मला एक सांगायचं होतं की शासनातर्फे अमूल व्हावं तमूक व्हावं हे सगळं ठीक आहे. पण शासन शेवटी आपल्या लोकांचे शासन असते. आणि सामान्य माणसाचं लोकशिक्षण केल्याशिवाय हे होणार नाही. म्हणून इथ 'पुनश्च हरि ओम्' असं टिळकांनी एकदा म्हटलं होतं. तसच पुन्हा म्हणून आमच्या लोकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करुन द्यायची- लोकशाही मूल्यांची जाणीव करुन द्यायची- या सामाजिक परिवर्तनाबद्दलची त्यांच्यात अस्मिता निर्माण करायची हे कार्य फार मोठं आहे. हे कार्य केल्याशिवाय कुठलीही लोकशाही स्थिर होणार नाही. अमूक पक्ष लोकशाही आणतो, तमूक पक्ष लोकशाहीवर गदा आणतो हें चुकीचं आहे. भारताचा सामान्य नागरिक हाच इथल्या लोकशाहीचं रक्षण करणार आहे. तो नागरिकजर सुबुद्ध असेल, याची जर लोकशाहीवरची निष्ठा अतिशय ज्वलंत असेल तर इथली लोकशाही स्थिर राहील.

यायालये काय किंवा वृत्तपत्रे काय किंवा कुठलेही जे लोकशाहीचे आधार स्तंभ आपण समजतो ते जर प्रखरपणे चांगले कार्य करती असतील तर त्याच्यामागे प्रभावी लोकमत असायला हवे. लोकशाहीचा खरा आधार इथला सामान्य माणूस आहे. सामान्य नागरिक आहे. इंग्रजीत असं म्हटंल आहे की "We Musducate Our Masters" हा इथला खरा मालक आहे. त्यांनी भारताची राज्यघटना निर्माण केलेली आहे. 'We the people oftdia" या शब्दाने आपल्या घटनेची सुरुवात होते. तेव्हा या माणसाला शिक्षित करणं आणि या माणसाला उभं करणंहे अतिशय जरुर आहे. मला एक अनुभव असा आहे की तो आणिबाणीत अनुभव आलेला आहे. की या माणसाला जर बरोबर गोष्टी सांगितल्या तर हा माणूस उभा राहतो. हा काही मूल्यांकरिता पाडतो. असा या भारतातला नागरिक आहे म्हणूनच मी मगाशी सांगितलं की इतर सगळ्या ठिकाणच्या लोकशाही पडत असताना या देशात लोकशाही टिकून आहे. त्याचं श्रेय संसदेला ही की सर्वोच्चन्यायालयाला नाही. ते इथल्या सामान्य माणसाला आहे आणि त्या सामान्य माणसाला शिक्षित करुन लोकशिक्षण हे फार मोठ्या प्रमाणावर दिलं तरच इथल्या राज्यघटनेला काही अर्थ आहे, तरच इथल्या लोकशाहीला काही अर्थ आहे.

माझं भाषण संपविण्याच्या पूर्वी मी आपल्या या नगरपालिकेचे आभार मानतो. त्यांनी मला इथं येण्यासाठी संधी दिली. आणि आपण जवळ जवळ एका तासापेक्षा जास्त अतिशय शांतपणाने भाषण ऐकून घेतलंत याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानून मी माझं भाषण संपवितो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org