व्याख्यानमाला-१९७६-२१

आणि म्हणून या राष्ट्राच्या प्रगतीमध्ये ज्या तत्त्वांचा आंतर्भाव अभिप्रेत होतो, ज्या समाजवादासंबंधी आपण घोषणा करतो, ज्या लोकशीही संबंधी आपण अभिमान बाळगतो, ज्या व्यक्ति स्वतंत्र्याचा आपण नेहमी गौरव करतो, आणि ज्या धर्म निरपेक्षतेसंबंधी आपण जागामध्ये ताठ मान करून वावरतो, त्यांचा निश्चित अर्थ अजून आपल्या जनसामान्यांना कळलेला नसावा. ते जो पर्यंत कळलेले नसतात तो पर्यंत लोकशाहीचे खरे फायदे, समाजवादाचे खरे फायदे, त्याच्या पर्यंत जावून पोहोचू शकत नाहीत, म्हणून ही अज्ञानाची अत्यंत प्रचंड अशा प्रकारची भिंत, आलेली नवीन मूल्यं आणि त्याचा पलीकडचा हा जनसामान्य यांच्यामध्ये उभी राहिल्यामुळे देशाच्या फलकावरती जे लिहिलं आहे, जे घडलं जात आहे त्या बिचा-याला कळलेलंच नसतं. आणि म्हणून तो अडाणी समाज खेडया मध्ये गेल्यानंतर ‘चंद्रावरती माणूस जाणे शक्य आहे काय ? शंकराच्या मस्तकावरती विराजमान होणारा चंद्र त्याच्यावरती मनुष्यासारखा पापी प्राणी पाय देऊ शकेल ? याच्यावरती आपला नाही बुवा विश्वास !’ असे सांगणारा मनुष्य ज्यावेळी आपणाला भेटतो त्या वेळेला इतकी साधी गोष्ट समजून घेण्यासाठी जीमनाची क्षमता लागते, जो नवा दृष्टिकोन लागतो, तोच त्याच्यापर्यंत पोहोचलेला नाही; त्याला गावच्या प्रगतीची आणि आपल्या राष्ट्राच्या प्रगतीची आणि आपल्या राष्ट्राच्या प्रगतीची आकडेवारी आणि त्याचं दृष्य समजावून घेण्याचं अत्यंत अवघड आहे. त्याला आकाशात भारताचा आर्यभट्ट आकाशात फिरतो म्हणजे काय ? हे तर त्याला कळणचं अशक्य आहे. त्याच्या मागे कोणाची प्रेरणा आहे, त्याच्यामागं भारतातील शास्त्रज्ञांची बुध्दिमत्ता आहे त्याच्यामागं आमच स्वत:च रचना कौशल्य आहे. त्या मागे आमच्या विज्ञान शाळेमधून केले जाणारे प्रयोग त्याच्यामागे आहेत. त्याच्यामागे आमच्या एका ऊर्जस्वल आत्मविश्वास उभा राहिलेला आहे, अशा राष्ट्रीय अस्मितेच दर्शन आहे. हा विचार त्याच्यापर्यंत पाहोचू शकत नाही. सुशिक्षितांपर्यंत ही जो पर्यंत पोहोचू शकत नाही. ब-याच जणाना मी विचारल्यानंतर त्यांची कल्पना अशी असते की अमेरिकेने मदत म्हणून आर्यभट्ट बहुतेक आकाशात सोडला असावा. वाचलेलंच नसतं. आकाशामध्ये आमचा ज्या वेळेला उपग्रह जातो, आमचा ज्या वेळेला अग्निबाण जातो त्या वेळेला तो आमचा आहे. हे देखील विश्वास ठेवण्याइतकी माहिती आपल्याला नसते. सुशिक्षितांना सुध्दा नसते. अशी परिस्थिती ज्या देशामध्ये आहे. तितिल्या जन समान्याला या देशामध्ये होत असलेला बदल प्रयत्नपूर्वक समजावून सांगणे, हे अत्यंत आवश्यक झालेलं आहे. कारण घडणारे बदल लक्षात येण्यामुळे, की पुढे घडवायचे बदल करण्यामध्ये त्याच्याही वाटा तो द्यायला पुढे होतो. नाहीतर त्याची अज्ञानामुळे समजूत असते की आपला देश मागे आहे, आपण गुलामीत आहोत, आपण मागासलेलेच आहोत इ. असा एका, अगतित, असा एका निराशाजनक परिस्थितीमध्ये तो राहिल्यामुळे त्याच्यात जी जिद्द निर्माण व्हायला पाहिजे ता जिद्द निर्माण होत नाही. आणि तो पुन्हा जुन्या वळणामध्ये, जुन्या समजुतींमध्ये, जुन्या अंधश्रध्देमध्ये, जुन्या व्रत वैकल्यांमध्ये स्वत:ला गाडून घेतो आणि पुन्हा आपली आणि आपल्याबरोबर देशाची सुध्दा प्रगती खुंटवून टाकतो, हा एक भाग झाला. आणि या नंतर हा एक भाग झाल्यानंतर या समाजामधले अज्ञान दूर करण्यासाठी जी एक समाज कार्यकर्त्यांची फळीच्या फळी उभी राहिल्याचे दिसायला पाहिजे होते या देशामध्ये, ती दुर्दैवाने स्वातंत्र्याच्या काळामध्ये कमी कमी होत गेलेली आपणाला दिसते. म्हणजे राजकीय कारणांसाठी सतत आजही कार्यकरणारे कार्यकर्ते तुम्हाला दिसतील. आणि त्याचा हेतू सत्ता मिळविणे, आपल्या विचाराचा प्रसार करणे, आपल्या पक्षाचे झेंडे मिरविणे याच्यासाठी आपल्याला अगदी अहमहमिकेने स्पर्धा लागलेली दिसते. लोकशाहीच्या दृष्टीने, राजकीय विचाराच्या दृष्टीने, फार चांगली गोष्ट आहे. वाईट काही नाही. परंतु हे करणा-या मंडळीवरती आणखी एक फार मोठी जबाबदारी असते, ती राजकीय पक्षाच्या पलिकडे जावून – मग कुठल्याही पक्षाच्या विचारांच्या पलिकडे जाऊन -  या राष्ट्राच्या प्रगतीच चित्र, या राष्ट्रामध्ये आलेल्या नव्या विचाराच चित्र, या राष्ट्रामध्ये घडत असलेल्या नव्या बदलांचं चित्र, या जनसामान्याला समजून सांगण्यासाठी अशा कार्यंकर्त्यांची आयोजना ठिकठिकाणी करावी लागते. याचा संदर्भ नसल्यामुळे आज काही एका विशिष्ट राजकीय हेतूच्या पलीकडे आपल्या जनसामान्याशी आपल्या राजकीय कार्यकर्त्यांचा किंवा सामाजिक कार्यकर्त्यांचा संबंध दिसत नाही, ही दुसरी गोष्ट झाली. आणि तिसरी गोष्ट अशी झाली की या जनसामान्यातून, काही वेगळी साधनें त्यांना प्राप्त परिस्थितीमुळे, ज्यांची परिस्थिती सुधारली त्यांच्याकडे जमीन होती ती कसली त्यांना कष्ट केले. त्यांच्यातून त्यांची परिस्थिती सुधारली नवे उद्योग आले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org