व्याख्यानमाला-१९७५-११

व्याख्यान दुसरे - दिनांक : १३-३-१९७५

विषय - “समाज सुधारणेच्या समस्या”

व्याख्याते - श्री. त्र्यंबक कृष्ण टोपे, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, मुंबई.

व्याख्याता परिचय -

जन्म : १९१४, येवला जि. नासिक

शिक्षण : बी.ए. १९३६, एम्. ए. १९३८, एल्. एल्. बी. १९४०.

१९७१ पासून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू.

१९३९ ते १९४७ रामनारायण रुईया कॉलेज, मुंबई येथे संस्कृतचे प्राध्यापक.

१९४७ ते १९५८ सरकारी लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे प्राध्यापक. १९५८ सरकारी लॉ कॉलेजचे प्राचार्य.

विद्यापीठाच्या विविध समित्यांवर काम केले.

भारतीय लॉ कमिशनचे ६ वर्षे सभासद, महाराष्ट्र सामाजिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून काही दिवस काम. महाराष्ट्र लीगल अँडव्हायझरी कमेटीचे सभासद, १९४३ ते १९६१ ऑफिसर U. O. T. C & N. C. C. म्हणून.

“Why Hindu code, A Modern sage”, “The Constitution of India” ही दोन पुस्तके फारच गाजलेली आहेत. “Bill of Right’s” या विल्यम ओ. डग्लस यांच्या पुस्तकांचा श्री. टोपे यांनी मराठीमध्ये “चिन्मय हक्क सूत्रे” म्हणून अनुवाद केला आहे.

“हिंदू समाजाचे वैशिष्ट्य आहे की कोणाही एका माणसाला मोठा करून त्याचा देव बनवून देव्हा-यात ठेवायचा पण त्याची तत्त्वे मात्र अमलात आणायची नाहीत. समाजजीवनातील निरनिराळे दोष नाहीसे करण्याचा एक तात्पुरता विचार म्हणजे समाजसुधारणा हे चुकचे मत आहे समाज पूर्णपणे उजळला गेला पाहिजे असे जोतिरावांचे मत होते. जोतीरावांनी उभे केलेले चित्र हिंदुसमाजाने पुरे केले असते तर, डॉ. आंबेडकरांना वेगळा मार्ग स्वीकारावा लागला नसता. समाजतील विचारवंत कार्यकर्तेसुद्धा जेव्हा मूळ गाभ्याला स्पर्श न करता नुसता घोळ घालत राहतात तेव्हा सामाजिक सुधारणांच्या मूळ मूल्य विचारांकडेच दुर्लक्ष होते.”

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org