व्याख्यानमाला-१९७४-१८

समाजवादाच्या विरुद्ध मी नाही. परंतु ज्या समाजवादाचे निश्चित असे ध्येय आहे, निश्चित असे काही नैतिक पाठबळ आहे तो समाजवाद योग्य आहे. ही व्यवस्था या देशामध्ये आली असेल तर प्रत्येक वर्गाने शिस्त अंगी बाणली पाहिजे. प्रत्येक वर्गाने जर असे ठरवले की आपण संघटित आहोत म्हणून आपल्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. तर मग देशामध्ये अनवस्था निर्माण होईल. उत्पादन अजिबात खंडन जाईल. तुमचे काही प्रश्न असतील त्याच्या संपादनासाठी तुम्ही जरुर भांडले पाहिजे. परंतु त्याला काही मर्यादा आहेत. संपामुळे उत्पादन थांबते. लोकाकर्मचारी रुळावर गाड्या आणून संप करतात. कोळसा वाहातूक थांबते. इंजिनियर्स संप करतात. यामुळे उत्पादनात खंड पडतो. या प्रकारांना आपण शिस्त लावू शकत नाही. उत्पादन वाढीशिवाय भांडवलाचा संचय नाही. आणि भांडवलाच्या संचयाशिवाय नवीन रोजगार नाही. तुटीच्या अर्थभरण्याने उत्पादन वाढते का ? थोडेफार वाढले तरी महागाई भरमसाट वाढते. हा भस्मासूर त्याला खाऊन टाकेल. शेतीचे उत्पादन गेल्या १० वर्षांत वाढले नाही. आपण घोषणा खूप दिल्या होत्या. शेतीच्या उत्पादनाला अग्रक्रम दिला नाही तर नियोजन आधी कळस मग पाया असे होईल. आणि सर्वांत आश्चर्यांची आणि लाजीरवाणी गोष्ट म्हणजे सहा हजार कोटींच्यावर भांडवल गुंतवणूक केली. या भांडवलातून नफा काढून त्यातून नवीन उद्योग काढावयाचे नवीन रोजगार निर्माण करायचा तर त्यामध्येच वेळोवेळी घट येत चालली आहे. रशियामध्ये प्रत्येक कारखान्याने नफा दाखविला पाहिजे. नाहीतर त्याला शिक्षा होईल असे आहे. निर्गत बाजाराचा व्यापार तंग आहे. आपण जर अविकसित. आपल्याला प्रगत देशाच्या मालाशी स्पर्धा करावयाची आहे. आपल्याला अनुकूल गोष्ट फक्त एकच म्हणजे लेबर चीप आहे. पण प्रत्यक्षात लेबर चीप नाही. कारण लोक काम करीत नाहीत, कष्ट करीत नाहीत, बॅंकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर बॅंकाची कार्यक्षमता कमी झाली आहे. वेतनाच्या मोबदल्यानुसार भरपूर काम झाले पाहिजे. नाहीतर आपण आंतरराष्ट्रीय बाजारात टिकाव धरू शकणार नाही. आणि असा टिकाव धरला नाही तर व्यापाराची धडगत नाही. निर्गत व्यापार फायद्याचा करायचा असेल तर उत्पादनात वाढ झाली पाहिजे. नानात-हेच्या आपत्ती आपल्यावर येतील आणि त्यामध्ये लोकशाही नष्ट होईल. लोकशाहीचे लोकांचे प्रश्न सोडविले पाहिजेत. ज्या लोकाशाहीमध्ये लोकांचे प्रश्न सोडविले जात नाहीत ती लोकशाही टिकत नाही असा इतिहास आहे आणि म्हणून लोकशाही टिकवायची आहे किंवा नाही याचा आपण गंभीर विचार केला पाहिजे. अशात-हेने प्रश्न आपल्या मनाला आपण विचारल्यानंतर आपण आपल्या मागण्या थोड्या कमी केल्या पाहिजेत आणि हे कोणी लक्षात घेत नाही अशी माझी तक्रार आहे. समाजवादीची मोठी शिस्त आपल्या अंगी बाळगल्याशिवाय समाजवाद येणार नाही. जे संधिसाधू आहेत त्यांना कुठल्याही संघटनात घेता कामा नये. मी आपला बराच वेळा घेतला माझे भाषण आपण शांतपणे ऐकून घेतले याबद्दल आपले आभार मानतो आणि पुन्हा या कार्यक्रमात भाग घेण्याची मला संधी दिली याबद्दल आपले आभार मानून आपली रजा घेतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org