व्याख्यानमाला१९७३-९

त्यांचं म्हणण अस आहे की गेल्या कांही वर्षात समाजवाद आणि भांडवलशाही यांच्यातल अंतर झपाट्याने कमी होत आहे. इतकेच नव्हे तर या दोन्हीचा एकमेकावर प्रभाव पडत चाललेला आहे. आणि दोन्हींच्या सीमारेषा एकमेकांमध्ये मिसळून चाललेल्या आहेत. एमेकात Converse  होत चाललेल्या आहेत. गॉलब्रेथ नावाचा एक अमेरीकन विचारवंत आहे. त्याने Theory of conversions हा विचार प्रथम मांडला. जगातल्या अनेक विचारवंतानी अर्थशास्त्रज्ञांनी त्या कल्पनांचा Theory of Conversion  चा पाठपुरावा केला. आणि आज पुष्कळसे विचारवंत या विष्कर्षाप्रत घेऊन पोचेले आहेत की दुस-या महायुध्दाअगोदरच भांडवलशाही स्वरूप, कम्युनिझमचं स्वरूप हे दोन्हीही आता इतिहास जमा होत चाललेले आहेत. एकमेकांचा दोन्हींवर प्रभाव पडत चाललेला आहे. उदा.- रशियामध्ये जो कम्युनिझम आहे त्याच्यामध्ये गेल्या सात-आठ वर्षांत अर्थव्यवस्थेत बदल होत चालला आहे, आणि आज रशियातील अर्थव्यवस्थेत Private  property, Profit  Motive  यांचा हळूहळू समावेश होत चालला आहे. त्यांच्याकडे ‘लिबरलमन’  म्हणून एक अर्थशास्त्रज्ञ होता त्याने. १९६४ साली एक वेगळा सिध्दांत मांडला. आणि त्यानंतर Profit motive, नप्याची प्रेरणा जी आहे ती शेतक-याच्या जीवनामध्ये तुम्हाला दिली पाहिजे असे सांगून Private Kitchen ची कल्पना हळूहळू सर्वमान्य होऊ लागली जाहे. इतकंच नव्हे तर रशियामध्ये ४०% भाजीपाला, ४०% फळफळावळ एकूण खाजगी बागेमध्ये होत आहे कीं ज्याचा मर्यादित का होईना, पण मालकांना मिळतो. खाजगी मालमत्तेची कल्पना तिथं हळूहळू उद्यास येत चाललेली आहे. Profit Motive  हे तत्त्वही आता मान्य करण्यात आले आहे, त्याचबरोबर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये Consumer’s Sovereignty असं आम्ही अर्थशास्त्रामध्ये म्हणतो. म्हणजे ‘ ग्राहकांचे सार्वभौमत्व ही कल्पना कम्युनिझमला केव्हाही. मान्य नव्हती. किंबहुना भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे ते एक व्यवछेदक लक्षण होय. आता तुम्हाला अस दिसून येईल की गेल्या सातआठ वर्षामध्ये Consumer’s Sovereignty ची जी कल्पना आहे. ग्राहकांचे सार्वभौमत्व जे आहे ही कल्पना रशियामध्ये हळूहळू सर्वमान्य व्हायला लागली आहे. त्याचं कारण असं आहे की ते Cousumers  विचारात न घेता मालाचे उत्पादन करीत असायचे. परिणाम असा व्हायचा की पादत्राणं करोडो प्रमाणावर उत्पादन करायची आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की लोकाना ती आवडत नसायची. आणि मग एका बाजूला मालाचे ढीगचेढीग पडलेले दिसायचे आणि दुस-या बाजूला लोकांच्या गरजा थांबायच्या. लोक खरेदी करत नाहीत असं जेव्हा त्याना दिसायला लागलं तेव्हां लोकांचे सार्वभौमत्व जे आहे ते देखील आपण विचारात घेतलं   पाहिजे आणि त्यानुसार उत्पादनात बदल केला पाहिजे हे उत्पादकांच्या लक्षात आलं. या उलट अमेरिकेसारख्या देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या बालेकिल्यात-महत्त्वाचे बदल होत चाललेले आहेत. आज आमेरिकेच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या २४% राष्ट्रीय संपती सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. गॅलब्रेथ एकदा थट्टेने म्हणाला होता की, राष्ट्रीय संपत्ती ही सरकारच्या नियंत्रणाखाली किती असावी याचा निकषलावला तर तुमच्या देशामध्ये २२%  ते २३ %  संपत्ती राष्ट्राच्या मालकीची आहे. आणि माझ्या राष्ट्रामध्ये २४% ते २५% संपत्ती राष्ट्राच्या मालकीची आहे. आणि हा जर निकष लावला तर माझा तुमच्या देशापेक्षां अधिक समाजवादी आहे. सांगण्याचा इत्यर्थ इतकाच की गेल्या १०-१५ वर्षामध्ये २४% ,२५%  राष्ट्रीय संपत्ती राष्ट्राच्या मालकीचीं आहे. दुस-या महायुध्दाच्या अगोदरच्या  काळाध्ये २ ते ४ टक्के एवढी देखील संपत्ती राष्ट्राच्या मालकीची नव्हती. अमेरिकन अर्थव्यवस्थेत-भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये Demand and Supply या संबंधी विचार केला जातो आधी Demand  मग Supply  पण तिथं आता उलट होत चाललेलं आहे. आधी Supply  आणि मग Demand  निर्माण करतात. प्रचंड प्रमाणात आधी Supply  करायचा आणि  मग Demand  निर्माण करायची जाहिरातींच्या रूपाने वेगवेगळ्या मार्गानीं अन्य नेहमीचे अर्थशास्त्रीय सिध्दांत आता शीर्षासन करत आहेत उलटे पालटे होत आहेत. हा बदल मी तुम्हास अशासाठी सांगतो आहे की परंपरागत अर्थशास्त्रामधल्या, राज्यशास्त्रामधल्या, समाजशास्त्रामधल्या ज्या कल्पना आहेत त्यांच्यामध्ये आता मूलभूत बदल होत चाललेले आहेत. या सर्व कल्पना एखाद्या वितळणा-या भांड्यात ठेवाव्यात असे त्यांचे स्वरूप झालेले आहे. हा जगभर होत असलेला बदल लक्षात घेऊनच कोणत्याही विचारांचा आपणाला यापुढे अभ्यास करावा लागणार आहे. तो Theory of Conversions  भांडवलशाही आणि समाजवाद हे तंत्रविषयक क्रांतीमुळे जवळ येत चाललेले आहेत. दोघांचा एकमेकावर प्रभाव पडत चाललेला आहे. आणि पुढच्या पंचवीस वर्षाच्या काळात दोघामधील अंतर पुष्कळच कमी होणार आहे. विसाव्या शतकच्या शेवटी या दोन्ही तत्त्वज्ञानामधील सीमारेषा इतक्या पुसट होणार आहेत की एकेकाळी यांच्यामध्ये शत्रुत्व होते. दोन टोकं होती हे एखाद्याला सांगूनही खरं वाटणार नाही. अशा त-हेचे युरोपमधील नामवंत विचारवंत आज सांगू लागले आहेत या पश्नाकडे मी तुमचे लक्ष वेधु इच्छितो ही पहिली गोष्ट. आणि दुसरा समाजवादाच्यादृष्टीने जगभर जो बदल होतो आहे, त्याबद्दल मी सांगतो आहे, आणि मग भारताकडे येऊ. भारताच्या सदर्भात या विचारांची नंतर आपण समीक्षा करू दुसरा बदल जो होतो आहे तो मी तुम्हाला मुद्दाम सांगतो आहे तिकडे  आपण गंभीरपणानं लक्ष दिलं पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org