यशवंत चिंतनिका १४

मार्क्सवाद

मार्क्सवादाच्या मर्यादा या शतकाच्या उत्तरार्धात सुस्पष्ट होऊ लागल्या आहेत. तरीही ही गोष्ट कबूल केली पाहिजे, की मार्क्सवादाच्या आधाराने अनेक प्रश्नांची मीमांसा राजकीय दृष्ट्या स्पष्ट व्हायला मदत होते आणि त्यामुळे मार्क्सवाद हा आजच्या जगातील राजकीय विचार जीवनाचा ब-याच अंशी अंगभूत असा भाग झाला आहे. मार्क्सवादाचा अभ्यास माझ्या राजकीय जीवनात मला उपयोगी पडला आहे. मार्क्सवादाच्या अध्ययनामुळे आज त्याच्या मर्यादाही समजण्यास मदत होते. वर्गसंघर्षावर आधारित अशा विकासवादावर मार्क्सवाद’ आधारित आहे. या नजरेने परिशीलन केले, म्हणजे मानवजातीच्या इतिहासाच्या घडामोडींचे स्वरूप स्पष्ट होऊ लागले.