यशवंत चिंतनिका २३

विज्ञान-संजीवनी विद्या

पण विज्ञानाकडे केवळ भौतिक दृष्टीने पाहून चालणार नाही. विज्ञान ही आधुनिक काळातील संजीवनी विद्या आहे. भारताला अशा संजीवनीची नितांत गरज आहे. कारण आपल्याला नुसते यंत्र नको आहे; त्या यंत्राबरोबर येणारे आधुनिक मन हवे आहे. आधुनिक मन हे कधीही स्थितिशील राहत नाही. ते चौफेर पाहते. इतर राष्ट्रांच्या प्रगतीचा सतत अभ्यास करते. असे आधुनिक मन भारताला हवे आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की आपल्या देशाच्या मनावर पुराणमतवादाचे प्रचंड ओझे आहे.

आत्मसंतुष्टता वा निष्क्रियता ही त्यातूनच येते. भारताच्या संदर्भात विज्ञान म्हणजे केवळ भौतिक सुखे निर्माण करणारी शक्ती असून, सामाजिक परिवर्तन घडविणारी ती सामाजिक शक्ती ठरणार आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org