यशोदर्शन-३

क-हाडचे सुपुत्र, आपल्या शिक्षण संस्थेचे प्रवर्तक, आरदणीय ना. यशवंतराव चव्हाण यांचा ४६ वा वाढदिवस क-हाडकरांनी मोठ्या दिमाखात साजरा केला. तेही साल १९५६ च! या निमित्ताने तुमच्या, वाङमंडळाने ‘यशोदर्शन भाग १’ हे चिमुकले ना. यशवंतरावांच्या बालपणीच्या, युवा जीवनातील साहसी आठवणीची पुस्तिका प्रसिध्द केली. तेच त्यांचे १ ले मुद्रित चरित्र असावे.

क-हाडचे सुपुत्र, दृष्टे देशभक्त, क्रांतिकारी, स्वातंत्र्यसेनानी, व्यासंगी समाजसेवक, अभिजात साहित्यिक, निर्वेर राजकीय नेते ही ना. यशवंतराव यांची आजची ओळख. त्यावेळच्या भल्याभल्यांना नव्हती! त्यांच्यातील उपजत, सात्विक जवीनमूल्यांची जाणीव त्यांच्यासमवेत, राजकीय क्षेत्रात वावरणा-या त्यांच्या बालमित्राना मात्र अनेक प्रसंग- घटनांतून होत असे. प्रसंगोपात त्याचा मौखिक आविष्कार क-हाडमधील स्नेहीमंडळीतून अभावितपणे प्रकट होई. त्या मौखिक, पण प्रत्यक्षदर्शनी आठवणींचे, छोटे संकलन म्हणजेच तुमचे १ ले, यशोदर्शन (भाग १)! आज ती तुमची छोटी पुस्तिका एक ऐतिहासिक दस्तऐवज ठरेल असा मला विश्वास वाटतो!

वयाच्या ४६ व्या वर्षी, ना. यशवंतराव चव्हाण हे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले. (सन १९५९) भारतीय संघराज्यातील १ ला सर्वात तरूण मुख्यमंत्री म्हणून त्यांचा देशपातळीवर उल्लेख होत होता. त्यांनीच ‘व्दिभाषिक मुंबई राज्याचे- संयुक्त महाराष्ट्र राज्य म्हणून स्थित्यंतर घडवून आणले. महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री झाले. हा सर्व इतिहास, आपणा क-हाडकरांना नक्कीच अभिमानासह, अहंकाराकडे नेणारा आहे. ते वास्तव आहे!!

माझ्या विद्यार्थी मित्रांनो! ज्यावेळी ना. यशवंतराव यांच्या कार्यकर्तृत्वाचा अरूणोदय होत होता, त्या काळात तुम्ही ना. यशवंतरावाच्या भावी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक प्रगल्भ उत्कर्षांचे ‘बीजांकूर’ जमा केलेत. ते त्यांच्या ‘आठवणी’ च्या स्वरूपात. छोटया छोटया लेखातून! निरागस बालमनाच्या तुमच्या प्रतिभेतून!! कविता, गद्य लेखन, माध्यमातून ते शब्दबध्द झाले आहेत. त्यातच खरे आदरणीय ना. यशवंतराव चव्हाण यांच्या भव्य, दिव्य जीवनकार्याचे भविष्यदर्शन घडते आहे. तुम्ही जमवलेल्या त्यांच्या आठवणीत, त्यांच्यातील उपजत, अभिजात, सात्विक, समता नि समष्टी जीवनाची मूल्ये प्रतिबिंबित होणारी आहेत. तुमचे हे अपूर्व भविष्यदर्शन- यशोदर्शन भाग १ (१९५९) मुलभूत सामर्थ्य मानावे लागेल!

ना. यशवंतरावजींच्या जन्मशताब्दी (२०१२-१३) संवत्सराच्या निमित्ताने- पुर्नमुद्रण- २री आवृत्ती तुम्ही आता प्रसिध्द करीत आहात. हा तुम्हा सर्व वर्गमित्रांचा संकल्पसुध्दा तुम्हा सर्वांच्या, सात्विक- शुध्द प्रेमाची साष पटवणारी कलाकृती ठरणार आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org