सह्याद्रीचे वारे - २

दुस-या आवृत्तीची प्रस्तावना

महान व्यक्तींचे विचार काळ उलटला तरी अढळ राहतात व भावी पिढ्यांना स्फूर्ती देत असतात. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण ह्यांचे व्यक्तिमत्त्वही असेच महान् व सर्वस्पर्शी होते.

मुख्यमंत्रिपदाच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत कै. यशवंतरावांनी महत्त्वाच्या प्रश्नासंबंधी जे विचार प्रदर्शित केले त्यांचे मोल आजही कायम आहे. त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचावेत म्हणून सह्याद्रीचे वारे या ग्रंथाची द्वितीयावृत्ती आम्ही काढीत आहोत. वाचक या उपक्रमाचे स्वागत करतील अशी आशा आहे.

महासंचालक,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
महाराष्ट्र शासन, मुंबई.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org