थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (14)

आपण निश्चीत केलेल्या देशप्रगतीच्या आराखड्याबाबत तुझ्या सारखा किमान एक तरी धाकटा बाळ जागृत आहे हे समजून समाधान वाटले. तुझ्याशी संपर्कासाठी इथल्या प्रथेप्रमाणे असलेले सर्व सोपस्कर पूर्ण करण्याच्या प्रक्रिया पत्र वाचून झाल्या झाल्या पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. माझी परवानगी घेवून मला शंका विचारणारे व अभिप्राय आणि मार्गगर्शन मागणारे, तीथल्या वास्तव्यातही अनेकजण आठवतात. इथे असा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे तू ज्याला हट्ट समजलेस तो हट्ट नसून तुमच्या तिथल्या मातीने तीथल्या लोकांवर केलेल्या संस्कारातील उत्तमोत्तम लाभस्थानापर्यंत जाण्याचा उत्तम व अंतीम मार्ग आहे. म्हणून तो तुझा हट्ट नसून हक्क आहे हे स्पष्ट होते. तरीही तुझ्या सुसंस्कृत सादरीकरणातला हट्ट स्विकारुन तूला पत्राने शंका व्यक्त करण्यांस परवानगी देण्याचा औपचारीक सोपस्कर पूर्ण झाला आहे. असे कळवताना मला तुझा अभिमान वाटतो.

आपल्या आश्रमातील नेहमीचे अध्यपनवर्ग “कारभा-यांच्या” देखरेखेखाली कार्यरत ठेवण्याची माझी अपेक्षा सर्वांना कळवण्याकरिता सांगत आहे. अनुयायी अध्ययनांत व्यत्यय निर्माण होवून अनुयायांचे लक्ष विचलीत होणार नाही याची दक्षता घेत आश्रमाच्या मधल्या प्रांगणांत तुळशी वृंदावनासमोर प्रार्थनावर्गाची सुरुवांत होण्यापूर्वी देण्यांत येणा-या सुचना काळांतच माझी वरील अपेक्षा सर्वांच्या कानावर घाल. इतक्या लांबून आवर्जून तू माझी आठवण केलीस व हट्ट धरून शंका समाधान मागण्याची इच्छा प्रगट केलीस यावरुन आपल्या परिसरांत संस्कृतीची मुल्ये जपण्याची परंपरा अखंडपणे कार्यरत असल्याबद्दल समाधान वाटले.

इथल्या नियमाप्रमाणे सिमेपार पत्रव्यवहारासाठी इथल्या शासनाची परवानगी लागते. याकरिता तुझ्याशी पत्रव्यवहार करण्याकरिता मी रितसर परवानगी मागीतली व परवानगीसाठी योग्य समर्थन केल्यामुळे तशी परवानगी मी घेत आहे. त्यामुळे तुझी शंका कळवल्यांस मी मार्गदर्शनवजा सुचना करीनच. तथापी तुझ्या शंकेतील संबंधीतांकडून अपेक्षा व्यक्त करणे इतकेच होईल. आता आदेश देण्याच्या मर्यादेपलीकडे आपले विश्व वेगळे असल्याने हा संकेत पाळणे आपले कर्तव्यच असेल. याबद्दल तू जागृत रहावे ही अपेक्षा.

यशोमंदीराकडे जाताना प्रेरणा व सामर्थ्यासाठी येथील कृष्णा काठच्या असंख्य अमृत शुभेच्छा.

तुम्हा सर्वांचा
यशवंतराव चव्हाण

 

स्व. यशवंतरावजीनी अनुयायी आश्रमातील अनुयायास शंका समस्या कळवण्याची परवानगी दि. ५ डीसेंबर २०१० च्या पत्राद्वारे दिली आहे. त्यानुसार हा अनुयायी स्व. यशवंतरावजींनी येथील वास्तव्यात दिलेल्या शिकवणूकीतून महाराष्ट्राला, देशाला विकास परिवर्तनांत लाभलेल्या यशाची परंपरा खंडीत होत असल्याबद्दल खंत व्यक्त करून अधोगतीकडून प्रगतीकडे वळण्याकरीता मार्गदर्शन मागत आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अनेक पीढींनी आपली आहुती देऊन या संग्रामात योगदान देणा-या पीढीतील स्व. यशवंतरावजींच्या व अनेक राष्ट्रवादी विचारसरणीच्या साक्षीने स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्य मिळालेल्या २०व्या शतकात आपण अनेक क्षेत्रात नेत्रदिपक यशही मिळविले. तथापी २१व्या शतकात जाण्याच्या तयारीत असतांना या सर्व यशाच्या शिखरांचा विध्वंस का करीत आहोत ?

आज आपल्या पुढील ही अग्रक्रमाची समस्या आहे. स्व. यशवंतरावजींच्या मार्गदर्शनानूसार नव महाराष्ट्र निर्माण होण्यांत व देशाला एक समर्थ आदर्श राज्य देण्यांत कोणतीही अडचण नसताना आम्हीच आमच्या विशिष्ट वाटचालीचा मार्ग हरवलो आहोत का ? आम्हाला संस्कृतिने दिलेले संस्कार, आमची मानवतावादी ऐतिहासिक परंपरा, सामाजीक नितीमत्ता, समता, ध्येयवाद, ऐक्य भावना इत्यादी मुल्ये आम्ही जतन करणार आहोत की नाही ? स्व. यशवंतरावजींच्या आदर्शांचे अध्ययन केलेल्या अनेक अनुयायांप्रमाणे आजच्या पीढीपुढे हा प्रश्न आहे. “थोरले साहेब – पुण्य स्मृती अभिवादन” या लेखमालेतील दुसरे पत्र आज सादर करत आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org