मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ६८

६८.  कलावंताची कदर करणारा रसिक - चित्तरंजन कोल्हटकर

श्रेष्ठ सत्ताधारी राजकारणी एरवी हळव्या मनाचा ‘माणूस’ही असू शकतो यावर सहसा कोणी विश्वास ठेवीत नाहीत. सत्ताधारी हा आपल्या इतमामात राहणारा, वागणारा असू शकतो, लोकांकडून नम्रतेची अपेक्षा बाळगणारा असतो हा आपला नेहमीचा अनुभव. सत्तेचा म्हणून काही विशेष तोरा त्याच्या अंगात मुरलेला असतो. परंतु अशा वागणुकीला अपवाद ठरणारा एक श्रेष्ठ सत्ताधारी तुमच्या-आमच्यात होता तो म्हणजे यशवंतराव चव्हाण !

माझे हे अनुभवाचे बोल आहेत. त्याचं असं झालं— आमचा म्हणजे आमच्या नाटक चमूचा मुक्काम तेव्हा नागपूरला होता. ‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकाच्या प्रयोगासाठी आम्ही नागपूरला मुक्काम करून होतो. प्रयोग जाहीर झाला. सर्वत्र फलक झळकले. नाटक हाऊसफुल्ल जाणार याची खात्री होती. योगायोग असा की, त्याच दिवशी यशवंतराव चव्हाण यांचा नागपूर येथे मुक्काम होता. त्या वेळी ते संरक्षण मंत्री होते.

यशवंतराव हे मराठी नाटकाचे, संगीताचे शोकिन. मुंबईत किंवा दिल्लीत असतील तर चांगले मराठी नाटक किंवा संगीताची मैफल चुकवायची नाही हा त्यांंचा कटाक्ष. आमच्या प्रयोगाच्या दिवशी ते नागपुरात होते, परंतु रात्री तेथे त्यांचा मुक्काम आहे की नाही, शासकीय कामात ते किती व्यग्र आहेत याची आम्हा मंडळींना सुतराम कल्पना नव्हती. त्यामुळे नाटकाच्या प्रयोगाला त्यांना आवर्जून बोलविण्याच्या पंâदात कोणी पडले नाही. परंतु घडले ते उलटेच ! यशवंतरावांचा निरोप आला- ‘मी नाटकाला येणार आहे!’ आमची धावपळ उडाली. दोन खुरर्च्या राखून ठेवाव्या लागणार होत्या. व्यवस्थापकांनी ती व्यवस्था केली खरी परंतु माझ्यासमोर भलताच पेचप्रसंग उभा राहिला. पेच कसला संकटच उभं राहिलं!

घोटाळा असा झाला होता की, त्याच दिवशी चुकून माझा पाय खड्ड्यात गेल्यामुळे दुखवला होता. डॉक्टरांनी पायावर चक्क प्लॅस्टर चढवले होते. प्रश्न असा निर्माण झाला की, प्लॅस्टरने जाडजूड बनलेला पाय घेऊन मी स्टेजवर जाणार कसा? यशवंतरावांसारखा रसिक प्रेक्षक समोर असताना, तशा बंदिस्त पायानं भू्मिका वठविणं मनाला प्रशस्त वाटेना. मनाचा निर्णय होत नव्हता. नाट्यप्रयोग तर जाहीर झालेला होता आणि प्रेक्षक तुडुंब भरले होते. यशवंतरावही दाखल झाले होते.

नाटकाचा अंक सुरू झाला. प्लॅस्टरनं बांधलेला पाय घेऊन मी विंगेत उभा होतो. माझ्या प्रवेशाला अजून अवकाश होता. रंगदेवतेनं एकाएकी प्रेरणा दिली असावी. मी खुर्चीवर बसलो आणि पायाचं प्लॅस्टर काढून टाकलं. परिणामाची फिकीर केली नाही. अन् स्टेजवर प्रवेश केला.

अर्ध्या तासाचा प्रवेश होता. व्यवस्थित पार पडला. प्रेक्षकांकडून वाहवा झाली. परंतु प्रवेश संपवून विंगेकडे निघालो तर काय, पायावर टरटरून सूज चढली होती. चप्पल पायाच्या बाहेरच राहात होती. अर्धा तास अखंड उभे राहिल्यानं आणि प्लॅस्टर नसल्यानं सूज चढली.

त्या अंकानंतर मध्यंतर होता. त्यामुळं थोडा वेळ मिळाला होता. म्हणून तिथेच एका कोप-यात बसून विजेच्या बल्बने पाय शेकण्याचा उपक्रम सुरू केला. पायाला शेक देण्याच्या नादात मी होतो तेवढ्यात स्वत: यशवंतराव समोर येऊन उभे राहिले. संयोजकांनी मध्यंतराच्या चहासाठी त्यांना बोलाविलं होतं. चहाची व्यवस्था थिएटरमध्ये दुस-या मजल्यावर करण्यात आली होती. मी निवांत जागा म्हणून, माडीवर जाण्याच्या जिन्याच्या खाली पाय शेकत बसलो होतो. कसे काय कुणास ठाऊक, यशवंतरावांनी मला पाहिलं आणि जिना चढून न जाता माझ्यापर्यंत पोहोचले.

कलावंताची कदर करणारा रसिक - चित्तरंजन कोल्हटकर

‘काय गाववाले, काय चाललंय?’— यशवंतराव. मी सारा किस्सा सांगितला. त्यासरशी माझ्या बकोटीला धरून त्यांनी मला उचलले आणि तसेच कवेत धरून, जिना चढून चहासाठी मला घेऊन गेले! मी तर पुरता शरमिंदा बनून गेलो. देशाच्या संरक्षणमंत्र्यांची अशी आपुलकी मला नवीन होती.

तशाच दुख-या पायानं मी नाटक पूर्ण केलं. नाटक संपवून यशवंतराव परत जायला निघाले तेंव्हा पुन्हा रंगपटापर्यंत आले. मला बजावलं की,

 ‘‘नाटक संपलयं. असाच हॉस्पिटलमध्ये जा आणि पायाचं प्लॅस्टर पूर्ववत करून घे. प्लॅस्टर बसवून झालंय हे मला समजलं पाहिजे. जबाबदारी लक्षात ठेवा. मघाशी पाय पाहिला त्याच वेळी, खरं म्हणजे मी तुला त्याच वेळी हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं होतं? प्रेक्षकांसाठी तू स्वत: यातना सहन करतोस याचा अभिमान वाटतो.’’

यशवंतरावांमधील माणूसपणाचं त्या रात्री मला वेगळंच दर्शन घडलं. दुरितांचं तिमिर जाण्यासाठी झटणा-या या माणसाची त्या रात्रीची आठवण माझ्या मनात बिंबून राहिली.

दिल्लीतल्या मुक्कामातील अनुभव तर थक्क करून सोडणारा आहे. ‘पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाचा दिल्लीत प्रयोग होता. यशवंतराव नाटकाला येणार असं आम्ही गृहीत धरलं होतं. परंतु त्यांनी आम्हाला त्या दिवशी वेगळाच धक्का दिला. पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंसमवेत नाटकाला येणार असल्याचा त्यांचा निरोप मिळताच आनंदाला पारावार उरला नाही.

नियोजित वेळेला पंतप्रधानांसह यशवंतराव दाखल झाले. नाट्यप्रयोग सुरू झाला. कलागुण दाखिवण्याची त्या रात्री जणू काही आमच्यात चढाओढच लागून राहिली. प्रयोग अप्रतिम रंगला.

पंतप्रधान पं.नेहरूंची उपस्थिती लाभलेली असल्यानं त्यांच्यासाठी चहापानाची चोख व्यवस्था थिएटरमध्ये अन्यत्र करून ठेवली होती. मध्यंतरात एका विशिष्ट दरवाजाने पं. नेहरू आणि यशवंतराव यांनी प्रवेश करायचे संयोजकांनी ठरविले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी भालचंद्र पेंढारकर आणि मंडळी त्या दरवाजाशी थांबली होती. खुच्र्यांची मांडामांड व्यवस्थित झालेली आहे किंवा कसे हे पाहण्यासाठी मी आत थांबलो होतो आणि खुच्र्या लावून घेत होतो.

मी पाठमोरा होतो अन् आश्चर्य असे की पं.नेहरूंच्या समवेत यशवंतराव तिथं पोहोचले होते. ‘अरे चित्तरंजन, काय करत आहेस, पंडितजी आलेत’ यशवंतरावांच्या तोंडून मी हे ऐकलं आणि सर्दच झालो. त्यांचं स्वागत करून त्यांना आत घेऊन येणारी मंडळी अजून दारावरच उभी होती. हे दोघे ज्येष्ठ चहाच्या टेबलापर्यंत पोहोचले होते. भांबावलेल्या मनानं मी तिथूनच ओरडलो, ‘अरे इकडे आत या, पंडितजी इथं आले आहेत.’

घडलं ते असं की, हे दोघेही त्या दरवाजाकडे गेलेच नाहीत. प्रेक्षागृहातून उठले ते सरळ स्टेजचा पडदा बाजूला करून मधल्या फटीतून स्टेजवर आले आणि तेथून थेट चहाच्या ठिकाणी !

‘असं कसं झालं ?’ - कुणीतरी यशवंतरावांना विचारलं.
‘‘अरे हे नटराजाचं क्षेत्र आहे. रंगमंदिर आहे. स्वागत करायचं ते त्याचं इथं कसला आलाय मानपान ? ’’
- यशवंतराव मोकळेपणानं हसले.

कलेची कदर करणारी ही आठवण मनात कोरून ठेवली आहे. कलेची आणि कलावंताची कदर म्हणून जी म्हणतात ती काही वेगळी असू शकते काय असा प्रश्न नेहमीच माझ्यासमोर उभा राहतो !

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org