शैलीकार यशवंतराव १३०

मा. यशवंतराव चव्हाण यांच्या एकूणच जीवनाकडे पाहताना त्यांची उपक्रमशीलता, त्यांची मानवतावादी वृत्ती लक्षात येते.  भाषा, कल्पनाशक्ती, वाङ्‌मयनिर्मिती व जीवन तत्त्वज्ञान यांचे परस्परांशी असणारे नाते आणि त्यांचा संस्कृतीशी असणारा अनुबंध प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांच्या 'शैलीकार यशवंतराव' या ग्रंथाच्या निमित्ताने जाणून घेता येईल.

''यशवंतरावांचा पिंड ललितलेखनाचा होता.  त्यामुळे त्यांनी केलेले गद्यात्मक लेखन लालित्याचा धर्म घेऊन येते.  त्यांच्या वैचारिक गद्य लेखनात त्यांच्या सकस आणि संपन्न विचाराचे दर्शन होते.  यशवंतरावांचा साहित्य संसार समाजप्रबोधन आणि समाजचिंतन या अंगाने जात असल्यामुळे त्यांच्या ललित लेखनातदेखील समाजचिंतनच आढळते.  अनुभव कथन व आत्माविष्कार ही प्रेरणा स्वीकारून त्यांचे लेखन झाले आहे.''  प्रस्तुत ग्रंथात डॉ. देखमुख यांनी यशवंतरावांच्या साहित्याच्या संदर्भात असे विचार नोंदवले आहेत.  त्यातून त्यांच्या लेखनातील प्रगल्भता लक्षात येते.  

मा. चव्हाणसाहेबांच्या भाषणात आणि लेखनात समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेला गती देण्याचे विलक्षण सामर्थ्य आहे.  या सामर्थ्याचा शोध घेणे हे संशोधकांनासुद्धा एक आव्हान आहे.  कारण त्यांचे साहित्य वर्तमानकाळाशी निगडीत असले तरी त्यात भूतकाळाचे अनेक संदर्भ असतात आणि उज्ज्वल भविष्यकाळाची दृष्टी दिसते.  या ग्रंथाच्या रूपाने त्यांच्या साहित्यिक जडणघडणीचा एक वैचारिक ठेवा आपल्या हाती पडत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे.  वाचक आणि अभ्यासक या ग्रंथाचे स्वागत करतील अशी मला आशा आहे.  डॉ. शिवाजीराव देशमुख यांच्या या ग्रंथास मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

आर. आर. पाटील (आबा)
माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य
अध्यक्ष : श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर

लेखकाचा थोडक्यात परिचय

प्रा. डॉ. शिवाजीराव मारुती देशमुख
एम. ए. पीएच. डी., मराठी विभाग,
रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, उस्मानाबाद

पीएच.डी. प्रबंधाचा विषय
'यशवंतराव चव्हाण : व्यक्ती आणि वाङ्‌मय'

१९९० पासून श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित तुळजापूर, उस्मानाबाद, पाचगणी येथे मराठी विषयाचे अधिव्याख्याता म्हणून काम केले.

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मराठी विभागात कार्यरत,

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,
औरंगाबाद येथे विविध समितींवर सदस्य म्हणून सक्रिय सहभाग.

मराठी भाषेचे डोळस अभ्यासक.
वाङ्‌मयीन नियतकालिकांमधून सातत्याने लेखन.
संशोधनपर लेख अनेक मासिकांतून प्रसिद्ध.
अनेक राज्य व राष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग व शोधनिबंध वाचन.  एम.फील. व पीएच.डी. च्या विद्यार्थ्यांना संशोधन मार्गदर्शन.
विविध दैनिकांमधून दर्जेदार संशोधनात्मक लेखन.
लोकसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक.
समकालीन व ग्रामीण साहित्याचा प्राधान्याने अभ्यास.  समाजाभिमुख चिंतनशील व्यक्तिमत्त्व.
साहित्यासोबतच मराठी संस्कृती, समाज, राजकारण, प्रशासन इ. विषयी विशेष रुची.
विद्यापीठ अनुदान मंडळाची टीचन फेलोशिप प्राप्‍त.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org