यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण :१०३

नेतृत्व (लहान-मोठे) उद्यास येते. नेतृत्व समाजातूनच पुढे येते व ते समाजाला पुढे नेते. ज्याच्या मागे लोक असतात. ज्याच्या शब्दाला मान असतो, वजन असते अशांना निवडणुकीतून महत्व येते. अनुयायांच्या संख्येवर पुढारीपणाचे मापन होते. विवेकवंत विविध पक्षात असतात. पक्षातील राहून नि:पक्षपातीपणे विवेक करणारे विवेकवंत फारच दुर्मिळ असतात. लोकसंग्रह राहून नि:पक्षपातीपणे विवेक करणारे विवेकवंत फारच दुर्मिळ असतात. लोकसंग्रह करण्याचा आजकाल प्रयत्न करताना आढळत नाहीत. ते एकाकी असतात. त्यांच्या विचारांचा परिणाम मात्र लोकांवर होऊ शकतो. विचारांना सामर्थ्य असते. संतांना कोणी पुढारी म्हणून संबोधित नव्हते, तरी त्यांच्यामुळे जनसमाज पालटला. दूरदर्शी विचार ज्यांना असतात, प्राप्त होतात ते जास्ती प्रभावी ठरतात. अभ्यास-मनन-चिंतनाच्याद्वारे प्रश्नांचे चालू स्वरूप व पुढील परिणाम यांचे भविष्यकालीन स्वरूप विचारवंत व्यक्त करू शकतात. अलीकडील काळात मानवेंद्रनाथ रॉय यांचे उदाहरण सांगता येते. शास्त्रीय व व्यवस्थित मांडलेले विचार लोक वाचतात व ऐकतात. वाचकवर्ग प्राप्त होणे जरूर असते. वाचकांच्या प्रतिक्रिया देखील लक्षात घ्याव्या लागतात. विचार शक्तिमान होऊ शकतात व ते नेतृत्व देखील करू शकतात उदा. म. जोतिराव फुले यांच्या ‘गुलामगिरी’  पुस्तकावर फार मोठी उपहारप्रधान टीका झाली व होऊ शकते. या प्रमुख पुस्तकाचे स्वरूप कसे असो वा नसो, त्यातील विचारामुळे सत्यशोधक समाज व पुढे सत्यशोधक चळवळ होऊन गेली. आजही महत्त्वाचे म्हणून ‘गुलामगिरी’ पुस्तक विद्वांनांना देखील मानावे लागते. नाईलाजत्यांचा होतो. प्रभावी क्रांतिकारक पुस्तके जगाच्या वाड्मयात फार निपजत नाहीत. म. फुले हे विवेकवंत व पुढारी देखील होते. त्यांना अनुयायी होते व असू शकतात. कित्येक विचारवंत त्यांच्या पुस्तकांतच राहतात व त्यांचा रहिवास पुस्तकाच्या कपाटातच असतो. कालबाह्य होणारी पुस्तके व विचार यांची संख्या मुबलक असते परंतु मार्क्सच्या मॅनिफेस्टोला आजही महत्त्व आहे, या सर्वांना पुढेही वैचारिक मूल्य राहील. माणसात पिळणारे व पिळून घेणारे असे दोन प्रकार राहतील तोपर्यंत तरी, मार्क्स व म. फुले मार्गदर्शक राहतील म्हणजे नेतृत्व करतील.

युगकर्ता

पुढारी हे स्वत: पुढारलेले असावेत. अगोदर विचार-विवेक व नंतर त्यांची कार्यवाही असा क्रम असतो. सर्वच मोठमोठ्या धर्माचे संस्थापक हे नेते होते, पुढारी होते म्हणून त्यांच्यामुळे निदान धर्मावर विचारांची समृद्धी उपलब्ध झाली. मोठमोठे धर्मसंस्थापक हे नवयुगप्रवर्तकच होते. युगकर्ता म्हणजे शककर्ता होय. नव्या कालगणनेला यांच्यामुळे सुरूवात झाली. महान सम्राटांची साम्राज्ये गेली पण मोठमोठ्या युगकर्त्या धर्मसंस्थापकांचे धर्म हयात आहेत.

युगकर्ता हा विवेकवंत, पुढारी, नेता व कर्मवीर देखील असावा लागतो असतोच. ‘नवे युग निर्माण करू’ म्हणून ते बळेच मुद्दाम तयार करता येत नाही, द्रष्टेपम लागते. प्रॉफेट कोणास म्हणावे व संबोधिले जाते यासंबंधीचे कस (Tests) आहेत. संदेष्टे जे सर्व झाले ते पुढारी नेतेच म्हणावे लागतात. केवळ राजकारणातील पुढारी हेच फक्त नेते नव्हते. श्रेष्ठ साधुसंत देखील नेते, पुढारी झाले व होत असतात. या सर्वांमुळे समाजाचे नैतिक परिवर्तन घडते, असा इतिहास आहे. स्वातंत्र्यसैनिकच देशभक्त होते असेच केवळ नव्हते. जे तुरूंगात गेले नाहीत, अशा अनेक नामवंतांनी देशाला पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले होते. कोणत्याही प्रश्नाची चिकित्सा करताना एकच बाजू पाहण्याची प्रथा पूर्ण सत्यवादी ठरत नाही. होऊन गेलेल्या थोरामोठ्यांच्या शताब्द्या साज-या होतात हे कृतज्ञतेला धरून आहे. पण नेत्यांचा व पुढा-यांचा फक्त शताब्दीवर्षात शासन, वृत्तपत्रे व नेत्यांची अनुयायी मंडळी प्रामुख्याने त्यांच्या विचारावर व कार्यावर प्रपंच करतात, मग पुढे सर्वच विसरले जाते!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org