यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ९१

१९६० : मे १, महाराष्ट्र राज्याची स्थापना व नव्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री.
१९६० : ऑक्टोबर २१, पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीतर्फे जाहिर सत्कार.
१९६० : नोव्हेंबर, अखिल भारतीय काँग्रेस निवडणूक मंडळावर निवड.
१९६० : नोव्हेंबर १०, नागपूर करार अंमलबजावणीचा एक भाग म्हणून महाराष्ट्र विधीमंडळाचे एक
        अधिवेशन नागपुरात दरवर्षी भरविण्यास सुरूवात.
१९६० : डिसेंबर, २१ महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना व नागपूर येथे मंडळाचे उद्घाटन.
१९६० : डिसेंबर, मुंबई येथे शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण.
१९६१ : काँग्रेस महासमितीमधून निवडणूक पद्धतीने अ. भा. काँग्रेस वर्किंग कमिटीवर निवड.
१९६१ : अ. भा. मराठी नाट्य संमेलन ४२ व्या (दिल्ली येथे भरलेल्य) चे स्वागताध्यक्ष.
१९६२ : मे १, पंचायत राज्य योजनेचा प्रारंभ.
१९६२ : ‘केसरी’ च्या दिवाळी अंकात ‘नियतीचा हात’ हा पहिला लेख प्रसिद्ध.
१९६२ : नोव्हेंबर २२, भारताचे संरक्षणमंत्री म्हणून सूत्रग्रहण.
१९६३ : नाशिक जिल्ह्यामधून लोकसभेवर बिनविरोध निवड.
१९६३ : अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे सचिव मॅक्कनमारा यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेस भेट.
१९६३ : ऑगस्ट, रशियाचा दौरा-क्रुश्चेव्ह यांच्याशी चर्चा.
१९६४ : २८ ऑगस्ट, रशियाचा दौरा.
१९६४ : दिल्लीतील महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती.
१९६५ : जानेवारी, अ. भा. मराठी नाट्य परिषद – ४७ वे अधिवेशन, नांदेड उद्घाटन.
१९६६ : जानेवारी, ताश्कंद येथे शास्त्रीजी – अयूबखान यांच्या चर्चेस उपस्थिती.
१९६६ : नोव्हेंबर १४, केंद्रीय गृहमंत्रीपदी नियुक्ती.
१९७० : जून २६, केंद्रीय अर्थमंत्री म्हणून नियुक्ती.
१९७१ : विकसनशील राष्ट्र परिषदेमध्ये आर्थिक विकासासंबंधी चर्चा.
१९७४ : ऑक्टोबर : केंद्रीय परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती.१९७५ : गियाना, क्युबा, लेबनॉन, इजिप्त,
         पेरू, अमेरिका, अफगाणिस्तान, इराक, कुवेत व फ्रान्स इत्यादी राष्ट्रांना भेटी.
१९७५ : डिसेंबर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – कराड, स्वागताध्यक्ष.
१९७६ : तुर्कस्तान, अल्जेरिया य देशांना भेटी.
१९७७-७८ : लोकसभेतील विरोधी पक्षनेते.
१९७८ : इंदिरा गांधी यांच्याबरोबर मतभेद होऊन संजीव रेड्डी काँग्रेसमध्ये प्रवेश
१९७९ : जुलै, चरणसिंग यांच्या संयुक्त मंत्रिमंडळात उपपंतप्रधान आणि गृहमंत्री.
       : डिसेंबर, थोर बंधुवत मित्र किसन वीर उर्फ आबा यांचे निधन
१९८० : सातारा मतदारसंघातून लोकसेवर निवड (रेड्डी काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव
        विजयी उमेदवार).
१९८२ : इंदिरा – काँग्रेसमध्ये प्रवेश व आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष.
१९८३ : जून १, सौ. वेणूताई यांचे निधन.
१९८४ : नोव्हेंबर २५, सायंकाळी ७.७० वाजता दिल्ली येथे निधन.
१९८४ : नोव्हेंबर २७ (दुपारी ३.४० वाजता क-हाड येथे) कृष्णा-कोयनेच्या प्रितिसंगमावर
        अंत्यसंस्कार.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org