यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ४

एक अभिनंदनीय उपक्रम-

माझे धाकटे बंधू श्री. शरद चव्हाण यांनी ११ एप्रिल १९८५ साली कै. यशवंतराव यांचे स्मारक वाईत व्हावे म्हणून ‘यशवंतराव चव्हाण ज्ञान विज्ञान मंडळ,’ वाई (रजि. नं. ८६१) स्थापन करण्यात पुढाकार घेऊन आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम चालू ठेवले आहेत. त्यात वैद्यकीय शिबीर, वासंतिक वर्ग, गणवेश, वह्या, पुस्तक वापट; व्याख्यानमाला वगैरे यांचा अंतर्भाव आहे. रौप्यमहोत्सवी वाटचाल पुरी करणा-या व सामाजिक बांधिलकीतून चाललेल्या या उपक्रमास श्री. शरद चव्हाण व कार्यकारी मंडळातील त्यांचे सहकारी यांना हार्दिक शुभेच्छा.

आदरांजली-

नुकतेच निधन पावलेले प्रसिद्ध उद्योगपती व नाणावलेले बांधकाम व्यावसायिक श्री. बी. जी. शिर्क यांना ‘रा. नां.’ च्या विषयी एक वेगळ्या प्रकारची आस्था व जिव्हाळा होता. ते नेहमी सामाजिक बांधिलकीतून प्रोत्साहन देत. त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.

नुकतेच रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचे हितचिंतक गु. नारायण सुर्वे यांचे दु:खद निधन झाले. ते वाईच्या कार्यक्रमास सन २००० साली आले होते. त्यांच्या हस्ते डॉ. राम ताकवले यांना ‘महर्षि विठ्ठल रामजी शिंदे’ पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या निधनाने एक आधार नाहिसा झाला. त्यांच्या नसण्यामुळे समाजाची, साहित्य क्षेत्राची व त्यांच्या कुटुंबियांची जशी हानी झाली आहे, तशी चव्हाण कुटुंबियांची सुद्धा झाली आहे. त्यांच्या स्मृतीस आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करीत आहे.

रा. ना. चव्हाण परिवारातील सदस्या व शलाका प्रकाशनच्या (मुंबई) प्रमुख, श्रीमती सरोज बाळ देसाई यांचे ४.८.२०१० ला दुख:द निधन झाले. सरोज वहिनीचा प्रेमळ, जिव्हाळ्याचा, मायेचा पाठिंबा लुप्त झाला. यामुळे त्यांचे पती बाळ देसाई व कुटुंबिय यांना झालेली हानी चव्हाण कुटुंबियांची सुद्धा आहे. चव्हाण परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org