साहेब यशवंतरावजी चव्हाण-२७

मराठी समाजात ब्राम्हण, मराठा, महार या जमातींच महत्व मी जाणून होतो. नवा महाराष्ट्र उभारीत असताना, मला ही मनं सांधायची होती. भावनिक एकतेवरच नवा महाराष्ट्र उभा करायचा होता. मना-मनातला दुरावा दूर करायचा होता, सर्जनशीलतेला प्रोत्साहन द्यायचं होतं. महाराष्ट्रजवळ जे जे चांगले आहे, जे जे उदात्त आहे त्याची जोपासना करायची होती. म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा ची स्थापना केली. विश्वकोशाचा जगडव्याळ उपक्रम हाती घेतला.

साहित्य, कला, नाटय, कुस्ती, तमाशा या क्षेत्रांना नवी पालवी फुटावी म्हणून आम्ही काही नवे उपक्रम हाती घेतले.

शिक्षण-प्रसाराच्या चळवळीला प्रचंड वेग दिला. सहकारी कायदे करून शेतक-याला सावकारी पाशातून मुक्त केले. अर्थ व्यवस्थेला ज्ञान-विज्ञानाची जोड देण्यासाठी, कृषी-औद्योगिक महाराष्ट्र उभा करण्यासाठी सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या काढल्या. शेती मालावर प्रक्रिया करणा-या उद्योगांचं जाळं वाढवलं...

लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता!
स्वातंत्र्यानंतर ‘स्व’राज्य आणि नंतर ‘सु’राज्याकडेच लोकशाही गेली पाहिजे.... पं. नेहरूंनी पंचायत राज्याचा उदघोष केला, आम्ही इंथ महाराष्ट्रात जिल्हा परिषदा स्थापन करून सामान्य कार्यकर्त्याला नेतृत्व-शिक्षणाची नवी प्रयोगशाळाच उघडून दिली.

हजारो तरूण कार्यकर्ते,
कित्येक सहकारी संस्था,
पंचायत समित्या, जिल्हा परिषदा चालवू लागले.
शेकडयांनी महाविद्यालयं निघाली.
अहो, चार कृषी-विद्यापीठं असलेलं महाराष्ट्र हे भारतातलं एकमेव राज्य आहे-एकमेव!

नव्या महाराष्ट्राची स्वप्न रंगवण्यात मी हा असा रात्रंदिवस बेहोष असतानाच, १९६२ च्या नोव्हेंबरात मला दिल्लीहून पं. नेहरूंचा फोन आला.

‘आपको देहली आना है| as defence minister-मगर, किसीसे कहना नही.’

“यह कैसा मुमीकन है? I must consult at least one person-“
“who is that?”
“My wife!”
हे ऐकून पंडितजी दिलखुलास हसले. म्हणाले,
“मगर, यह बात बिलकूल—“
“l understand, l  will  keep it  with  me. l  will  come,  that’s  certain l”

मुंबईत बसलेला जम सोडून दिल्लीला यायला वेणूबाई तशी नाराजच होती. .. मातोश्री विठाबाई वृध्द....
पंडितजींचा पुन्हा फोन आला:
“ताबडतोब या-“
गेलो. म्हटलं
“पंडितजी, डिफेन्स प्रॉब्लेम्स की जानकारी के लिये मुझे कुछ समय चाहिये-“
“आप जल्दीही समझ जाएंगे-मुझे यकीन है,

l  want  you  in  Delhi!
“मी उद्या पुन्हा आपली भेट घेतो.”
“Oh!  no,  no,  no- there  is  no  going  back  now-“

मी दिल्लीत यायच्या आधीच चीननं ४० मैल आत मुसंडी मारलेली- (तोफांचा गडगडाट ऐकू येतो)
मी दिल्लीत पोतल्यापासून बिजू पटनाईकांनी माझ्या मागं धोशा लावलेला.
“परत जा! मुंबईला परत जा!!”

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org