साहेब यशवंतरावजी चव्हाण-१२

पंडित मदन मोहन मालवीयजींच्या सभेला
भाऊसाहेब बटाणे आणि नरसिंह चिंतामण केळकर-
असे दोन अध्यक्ष होते; म्हणून मी ‘ज्ञानप्रकाश’ ला बातमी पाठवली:
“तात्यासाहेब केळकरांना अर्धे अध्यपद!’
गावातनं कुणीतरी माझा मित्र गौरीहर सिंहासने याच्या बनावट सहीनं
‘ज्ञानप्रकाश’ ला पत्र पाठवलं, की ‘ही बातमी चुकीची आहे!’
त्यांनी ते छापलं- आता काय करायचं?
मी आणि गौरीहर पुण्याला गेलो,
काकासाहेब लिमयांना भेटलो- ‘ज्ञानप्रकाश’ चे संपादक- ते म्हणाले:
(अनुनासिक)  “तुम्ही दुसरं पत्र द्या. आम्ही तेही छापू.”
त्यांनी आमचंही पत्र छापलं!
पण, या घटनेनं माझ्यातला ‘किंचित बातमीदार’ मात्र तिथेच संपला!
पुढं,अनेक थोर संपादकांशी माझे स्नेहाचे संबंध जुळले, त्याची ‘गंगोत्री’
हीच तर नसेल?

‘गोलमेज परिषदे’ ला हजर राहून
गांधीजी परत आले...
देशात सत्याग्रह-संग्रामाचं वातावरण तयार झालं!
ब्रिटिशांची दडपशाही चालूच होती-
मी घरात सांगून टाकलं:
“यंदा काही मी मॅट्रिकला बसणार नाही!”
आणि कार्यकर्त्यांना म्हणालो,
“मी तुमच्याबरोबर आहे- जरूर तर आघाडीवरसुद्धा राहीन-“

गांधीजींना अटक झाली- निषेधार्थ देशभर निदर्शनं झाली...
आम्ही मुला- मुलांनी झाडावर तिरंगी झेण्डा फडकावला!
(‘वंदे मातरम्’ च्या घोषणा)
पोलिस-अधिका-यानं आम्हाला हेडमास्तरांच्या खोलीत जाब विचारला.
“हो! मी केलंय् हे!!”
मी ठामपणे सांगितलं. मला अटक झाली...
सक्रिय राजकारणाची ती पहिली,
शास्त्रपूत अशी दीक्षा होती, दीक्षा!
तेव्हा माझं वय होतं १७-
१८ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली मला...
निरोप द्यायला आई आली होती,
मास्तरपण आले होते. म्हणाले,
“अरे माफी माग-सोडून देतील!”
तशी आई उसळून म्हणाली,
(खंबीरपणे) “काय बोलता तुम्ही मास्तर?
मापी मागायचं काई बी कारन नाय्-
द्येव आपल्या पाटीशी हुबा हाय रं येशवंता!”
आईचा हा मोठेपणा,
मला एक विलक्षण उदात्त वळण देऊन गेला...

‘दहा बाय बारा’ च्या कोठडीतली ती पहिली रत्र.
त्या गुदमरणा-या वातावरणात आधी मला झोपच आली नाही;
सकाळी उठून पहातो, तो-
कुठल्यातरी संस्थानातला कैदी,
हातापायात बेडया, अंगावर कैद्याचे कपडे-
मी त्याला विचारलं: “बेडया का रे घातल्या?”
“मी तुरचीचा कृष्णा धनगर-“
त्याचं ते रूप पाहून माझ्या मनात विचार आला:
राम गणेश गडकरी यांच्या ‘राजसंन्यास’

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org