लोकनेते यशवंतराव चव्हाण - ४७

संदर्भ पुस्तके

१. कृष्णाकाठ (आत्मचरित्र)     - यशवंतराव चव्हाण
२. विचारधारा (गाजलेली भाषणे) - यशवंतराव चव्हाण
३. सह्याद्रीचे वारे        - यशवंतराव चव्हाण
४. युगांतर             - यशवंतराव चव्हाण
५. ऋणानुबंध           - यशवंतराव चव्हाण
६. यशवंतराव चव्हाणः विविधांगी व्यक्तिमत्त्व    - वि. वि. पाटील
७. यशवंत (‘लोकराज्य’ मासिक मार्च २०१२)    - संपादक- माहिती व जनसंपर्क महासंचालनायल, (महाराष्ट्र शासन)

प्रकाशित पुस्तके -

१) एस्. एम. जोशीः व्यक्ती व विचार (राज्यसत्रीय प्रथम क्रमांक प्राप्त पुस्तक)
२) सहकारातील दीपस्तंभः तात्यासाहेब कोरे
३) कर्मयोगीः बाबा आमटे
४) युगपुरूषः महात्मा फुले
५) आनंदवनः एक ध्यासपर्व
६) लोकनेतेः यशवंतराव चव्हाण

पुरस्कार-

१) प्राचार्य नलिनीताई वैद्य राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार – २००७
२) प्रगत महाराष्ट्र फेलोशिप सन्मान – २००८

महाराष्ट राज्य उद्योगधंद्याच्या बाबतीत भारतात सर्वात आघाडीवर राहिले. उद्योगधंद्याचा पाया बळकट असल्याखेरीज आपल्या पंचवार्षिक योजना पूर्णपणे यशस्वी होऊ शकणार नाहीत. रोजगारवृद्धी व जनतेचे राहणीमान उंचाविण्यासाठी ओद्योगिकीकरणाची गती वाढविणे गरजेचे आहे. विदर्भ, मराठवाडा, मुंबईसह ‘संयुक्त महाराष्ट्र’ निर्माण झाल्याने मराठी प्रदेशातील माणसे एकमेकांच्या खूपच जवळ आली.

विकासाच्या योजनेमध्ये माणूस हा केंद्रभूत असला पाहिजे. आधुनिक पद्धतीचा वापर शेतीक्षेत्रात करण्याबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राकडेही राज्यकर्त्यांनी लक्ष दिले पाहिजे. समान संधी ही सामाजिक न्यायाच्या कल्पनेतील महत्त्वाची बाब आहे. सर्वांना समान सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी अविरत योजना आखणे यावरच राजकारणातील यशापयश अवलंबून आहे.

माझ्या ४० वर्षांच्या राजकीय वाटचालीत मी विधानसभा व लोकसभेच्या मिळून एकूण १० निवडणूका लढविल्या व सर्व जिंकल्याही. प्रतिस्पर्ध्यांच्या जहाल टिकांनाही संयमाने सामोरे गेलो. काँग्रेस पक्षावरील असणारी निष्ठा, राजकारणातील तत्त्वनिष्ठता, कार्यकर्त्यांची साथ व जनतेचे अलोट प्रेम या माझ्या राजकीय जीवनातील जमेच्या बाजू होत.

- यशवंतराव चव्हाण.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org