लोकनेते यशवंतराव चव्हाण - ४६

जीवनपट

जन्म   -  १२ मार्च १९१३
मृत्यू   - २५ नोव्हेंबर १९८४

१९१३    - १२ मार्च, रोजी जन्म सातारा जिल्ह्यातील (सध्या सांगली जिल्हा) देवराष्ट्रे या गावी.
१९१७    - वडील बळवंतराव चव्हाण यांचे प्लेगच्य साथीत निधन. देवराष्ट्रे येथे चौथीपर्यंत शिक्षणानंतर कराड येथे शिक्षणासाठी दाखल.
१९२९    - भगतसिंगाच्या फाशीनंतर स्वातंत्र्यलढ्याला आयुष्य वाहून घेण्याचा संकल्प.
१९३०-३१ - असहकाराच्या (कायदेभंग) चळवळीत सहबभाग १८ महिन्यांच्या तुरंगवासाची शिक्षा.
१९३४    - मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण. कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश. (प्राचार्य डॉ. बाळकृष्ण व प्रा. ना. सी. फडके यांचे मार्गदर्शन)
१९३८    - इतिहास व राजकारण हे विषय घेऊन मुंबई विद्यापीठाची बी. ए. ही पदवी परीक्षा उत्तीर्ण. पुणे येथील लॉ कॉलेजमध्ये प्रवेश.
१९४०    - सातारा जिव्हा काँग्रेसचे अध्यक्ष.
१९४१    - (ऑगस्ट), एल. एळ. बी. परीक्षा उत्तीर्ण.
१९४२    - (२ जून) कराड येथे वेणूताईंशी विवाहबद्ध.
१९४२    - (९ ऑगस्ट), ‘छोडो भारत’ आंदोलनात सहभाग व अटक.
१९४४    - ‘राजकीय क्रांती’ या विषयावर कविता (तुरुंवास)
१९४६    - (१४ एप्रिल), गृहखात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून निवड.
१९४८    - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस.
१९५२    - कराड मतदारसंघातून विधानसभेवर निवड व नागरी पुरवठा मंत्री म्हणून नियुक्ती.
१९५६    - (१ नोव्हेंबर), विशाल द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना व द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वयाच्या ४३ व्या वर्षी निवड.
१९५७    - (एप्रिल), मुंबई विधानसभेसाठी पुन्हा विजयी व पुनश्च मुख्यमंत्री.
१९५७    - (३० नोव्हेंबर), प्रतापगडावर शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे पं. नेहरुंच्या हस्ते उद्घाटन.
१९५९    - (२९ डिसेंबर), अलिगड मुस्लीम विद्यापीठ, यांच्यावतीने ‘डॉक्टर ऑफ लॉ’ पदवी प्रदान.
१९६०    - (मार्च) बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी.
१९६०    - (१ मे), महाराष्ट्र राज्याची स्थापना. पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांचा शपथविधी (वय ४७)
१९६०    - (१० नोव्हेंबर), राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरात भरविण्यास प्रारंभ.
१९६१    - (दिल्ली) ४३व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष.
१९६२    - (१ मे), पंचायत राज्य योजनेस प्रारंभ.
१९६२    - (फेब्रुवारी), महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका, काँग्रेसने २६५ पैकी २१४ जागा जिंकून प्रचंड विजय मिळविला.
१९६२    - (२२ नोव्हेंबर), भारताचे संरक्षणमंत्री म्हणून सूत्रग्रहण.
१९६३    - नाशिक जिल्ह्यामधून लोकसभेवर बिनविरोध निवड.
१९६३    - अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे सचिव मॅक्नोरा यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेस भेट.
१९६३    - (ऑगस्ट), रशियाचा दौरा.
१९६५    - (१८ ऑगस्ट), आई विठामाता यांचे निधन – मुंबई.
१९६६    - (जानेवारी), ताश्कंद येथे शास्त्रीजी – आयुबखान चर्चेस यशवंतरावांची उपस्थिती (कोसिजीन यांच्या प्रयत्नानुसार)
१९६६    - (१४ नोव्हेंबर), केंद्रीय गृहमंत्रीपदी निवड.
१९६६    - गृहमंत्रीपदी निवड. सहा महिन्यांतच १० राज्यपालांची नियुक्ती.
१९६९    - (२३ फेब्रुवारी), कानपूर विश्व विद्यालयातर्फे ‘डॉक्टर ऑफ लॉ’ सन्मानपूर्वक बहाल.
१९७०    - (२६ जून), केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निवड.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org