१६. श्री. बाबासाहेब भोसले
संयुक्त महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री
(२१-१-१९८२ ते १-२-१९८३)
जन्म व शिक्षण
श्री. बाबासाहेबांचा जन्म १५-१-१९२१ रोजी सातारा जिल्ह्यातील तारळे ह्या गावी झाला. त्यांचे वडील असिस्टंट एज्युकेशनल शिक्षण राजाराम महाविद्यालयात झाले. इंटरनंतर त्यांनी एल.एल.बी. केले व १९५१ ला त्यांनी बार लॉ ॲक्टला पूर्ण केले. त्यानंतर जवळजवळ दहा वर्षे साता-यास वकिली केली. नंतर ते महाराष्ट्र महसूल न्यायमंडळाचे सदस्य झाले. सातारा मतदार संघातून लोकसभेचे तिकिट मागू नये म्हणून त्यांना महसूल न्यायमंडळाचे सदस्य नेमले होते असे म्हणतात. त्यांना महसूल न्यायमंडळाचे अध्यक्ष नेमले नाही म्हणून त्यांनी महसूल न्यायमंडळाचा राजीनामा दिला व हायकोर्टाच्या अपेलिएट साईडला प्रॅक्टीस करण्यास सुरुवात केली. महसूल न्यायमंडळाचा सदस्य असताना कुळ वहिवाटीच्या कायद्याखाली त्यांनी शेकडो प्रकरणे निकालात काढली व शेतीसुधार कायद्यांची अंमलबजावणी करण्यास मोठी चालना दिली.
राजकारणात प्रवेश
विद्यार्थी दशेत असतानाच १९३९ साली वैयक्तिक सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता.
टीपः लाला लजपतराय महाविद्यालयाचे प्राचार्य असताना मी बाबासाहेबांना भेटलो होतो. परंतु त्यांचा-माझा परिचय नाही. रेव्हेन्यू ट्रायब्युनल सदस्य असताना ते महाविद्यालयाजवळील शासकीय इमारतीत राहत होते. ते हाजीअलीजवळील पानपट्टीवाल्याकडून पान खरेदी करत असत. त्यांचा विनोदी स्वभाव आणि त्यांचे विनोद ह्याबाबत मी हाजीअलीला असताना अनेक गोष्टी ऐकल्या होत्या.
-डॉ. रायरीकर
कोल्हापूर विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. खटाव तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे खजिनदार होते आणि महाराष्ट्र इंदिरा कॉंग्रेसचे चिटणीस होते.
विधिमंडळात प्रवेश
१९८० साली नेहरूनगर मतदारसंघातून ते विधानसभेत निवडून आले. त्यावेळी त्यांच्याकडे विधि, न्याय, कामगार व वाहतूक ही खाती होती. काही काळ ते कायदामंत्री होते. कायदेमंत्री असताना त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. त्यांनी पंढरपूर विठोबाचे दर्शन वारक-यांना सुलभ केले व बडवेगिरी बंद केली. श्री सिध्दीविनायक हा एक वादग्रस्त विषय होता. बाबासाहेबांनी त्याचा ट्रस्ट केला. अर्थात विश्वस्तांची निवड वादग्रस्तच होती.