आमचे मुख्यमंत्री -५१

मध्यवर्ती सरकारात कृषिमंत्री

भाजपचा २००४ च्या निवडणुकीत पराभव झाला. कॉंग्रेसने सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस होती व राष्ट्रवादीचे प्रतिनिधी म्हणून पवारांना डॉ. मनमोहनसिंगांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री म्हणून स्थान मिळाले (UPA Government).

इतर क्षेत्रातील पदे

त्यांनी इतर क्षेत्रांतही महत्वाची पदे भूषविली. ते भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आहेत. रयत शिक्षण संस्था, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन, महाराष्ट्र कुस्तीगिरांची परिषद, यशवंतराव प्रतिष्ठान ह्या संस्थांचे ते अध्यक्ष आहेत.

शरदजींचे व्यक्तिमत्व

शरद पवार ही महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती राष्ट्रीय मंचावर आहे हे निर्विवाद. त्यांचे कर्तृत्व पुरोगामी व गतिमान आहे. सामान्य जनांचे प्रश्न, शेती आणि राष्ट्रीय समस्यांची त्यांना जाण आहे. ते उत्तम, अभ्यासू प्रशासक तर आहेतच, परंतु ते मुत्सद्दी असून त्यांची राजकारणातील रंगपटात नेहमीच प्रमुख भूमिका असते. त्यांचा लोकसंग्रह मोठा असून त्यांची जनमानसावर पकड आहे. त्यांना माणसाची उत्तम पारख असून कोणाचा केव्हा उपयोग करायचा ह्याचीही त्यांना चांगली जाण आहे. सामाजिक न्यायावर त्यांची श्रध्दा आहे. बदलत्या आर्थिक, सामाजिक प्रवाहांची त्यांना सखोल जाण आहे व त्याबाबत त्यांचा अभ्यासही आहे.

त्यांचे व्यक्तिमत्व बहुरंगी आहे. ते उपमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते आणि केंद्रीय मंत्रीही होते – आहेत. कॉंग्रेसच्या आत होते व आता बाहेर आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अवमूल्यन कधीच झालेले नाही. दुर्दैवाने त्यांच्या तोलाचा महाराष्ट्रात एकही पुढारी आज नाही. मारक्वीस (Marquis) च्या Whose who in the world ह्या ग्रंथात त्यांच्या चरित्राचा उल्लेख आहे.

संदर्भग्रंथः
सोपान गाडे – शरद पवार, जानेवारी २००२, अविष्कार प्रकाशन.
देसाई दिनेश – शरद पवार – द मॅन फॉर ऑल क्रायसेस, पारुट प्रकाशन, मुंबई.
अशोक राजा शिंदे – राष्ट्रवादाचा मेरुपर्वत, १२-१२-९९ दामिनी पब्लिकेशन.
रविकिरण साने – शरद पवार, स्वामी प्रकाशन, पुणे. प्रकाशकः मदन पाटील.
ह.मो.मराठे – एक माणूस – एक दिवस १९९६, शरद पवार – नेता-राज्यकर्ता, पृष्ठे १५५-१७५
पुण्यनगरी – रविवार, २५-६-२००६ व ५-२-२००६
महाराष्ट्र टाईम्स – १२-१२-२००५
टाईम्स ऑफ इंडिया – १२-१०-२००५.
लोकमत – १२-१२-२००५
वार्ताहर – रविवार, ५-१२-२००६
रविंद्रनाथन पी.के. – द मेकिंग ऑफ मॉडर्न मराठा, १९९२, यु.बी.एस. पी. डी.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org