कथारुप यशवंतराव-.... म्हणून परत आलो !

.... म्हणून परत आलो  !

न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी  सांगितलेली ही आठवण. पुण्याच्या ' दैनिक प्रभात ' ने एक कार्यक्रम आयोजित केला होता. न्या. धर्माधिकारी प्रमुख पाहुणे होते, तर यशवंतराव त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यशवंतरावांनी आपल्या भाषणात वर्तमानपत्रांच्या दायित्वाबद्दल सखोल विवेचन केले. त्यावेळी ते मंत्री नव्हते. धर्माधिकारी मात्र उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. समारंभ संपल्यावर एका हॉटेलच्या गच्चीवर निमंत्रितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यशवंतरावांची आणि न्या. धर्माधिकारी यांची जिव्हाळ्याची चर्चा झाली. जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला. भोजनानंतर यशवंतराव लिफ्टमधून खाली त्यांच्या गाडीजवळ गेले. परंतु आपण काहीतरी विसरलोय हे त्यांच्या लक्षात आले  व ते पुन्हा गच्चीवर आले. न्या. धर्माधिकारी यांच्याशी प्रेमाने हस्तांदोलन केले व म्हणाले, ' तुमचा व न्यायमूर्तींचा निरोप घ्यायलो विसरलो होतो, म्हणून परत आलो .' न्यायालयीन पदावर असलेल्या व्यक्तीची व पर्यायाने न्यायालयाची प्रतिष्ठा जोपासणारे असे सुसंस्कृत व्यक्तिमत्व विरळाच.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org