थोरले साहेब - २००

भारताच्या लष्करानं पाकिस्तानचा पराभव करताच युद्धसमाप्‍तीची भाषा सुरू झाली.  १ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर १९६५ या कालावधीत हा युद्धसंग्राम घडला.  अमेरिका, ब्रिटन आणि रशिया यांच्या मध्यस्थीनं युद्धसमाप्‍तीची घोषणा झाली.  युद्ध थांबलं त्या वेळी भारताच्या ताब्यात ७४० चौरस मैलांचा पाकिस्तानचा भूप्रदेश होता व पाकिस्तानच्या ताब्यात भारताचे २१० चौरस मैलांचे क्षेत्र होते.  पाकिस्ताननं पराभवाला जबाबदार असणार्‍या ११ जनरलच्या हुद्द्यावरील लष्करी अधिकार्‍यांना व कर्नलच्या हुद्द्यावर असणार्‍या ३० अधिकार्‍यांना तडकाफडकी सेवानिवृत्त केलं.  भारताच्या लष्करालाही मोठं नुकसान सोसावं लागलं.  युद्धसमाप्‍ती पाकिस्तानच्या फायद्याची ठरली.

पाकिस्ताननं इचोगिल कालव्यावरील पूल जर उडवला नसता तर भारतीय सैन लाहोर काबीज करू शकत होतं.  लाहोर परिसरात चिनाब नदी वाहते.  यालगतच अटक आणि वजिराबाद शहरे आहेत.  १७५८-५९ मध्ये छत्रपतींचे पेशवे रघुनाथराव यांनी मराठ्यांच्या फौजेचं नेतृत्व करून अटकेपार झेंडा फडकाविला होता.  मराठ्यांचे वंशज साहेब भारताचे संरक्षणमंत्री म्हणून अटकेजवळ पोहोचले.  महाराष्ट्रासाठी ही गौरवाची बाब आहे.  'मराठा गडी, यशाचा धनी' हे ब्रीद साहेबांनी खरं करून दाखविलं.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारतानं युद्धात विजय मिळविला.  भारतीय नागरिकांमध्ये वीरत्वाची भावना संचारली.  प्रसिद्धीमाध्यमांनी साहेबांना डोक्यावर घेतलं.  अनेक वर्तमानपत्रे संपादकीय लिहून साहेबांना 'रणधुरंधर' म्हणून गौरवू लागली.  अनेक कवी साहेबांवर काव्य रचू लागले.  पाक युद्धानं साहेबांची कीर्ती भारताच्या सीमा पार करून सातासमुद्रापलीकडे पोहोचविली.  भारताचं भविष्य या रणवीराच्या हाती सुरक्षित आहे अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली.  साहेब यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचले.

कविरत्‍न भगीरथ भास्कर (केथवा, जि. इटावा) लिहितात,

वही किल्ला, वही दिल्ली, वही वीर चौहान ।
वही चंद्रकवी आज भी, मारि शत्रू मैदान ।
यशवंतराव तूं सिंह है, हाथशक्ति तलवार ।
युगप्रहरी तू राष्ट्र का, करो देश उद्धार ।
वहाँ मान, गौरव, वही स्वर्ग का वास ।
वीरों का जाँ रक्त से, लिखा जाता इतिहास ।

मुजफ्फूरचे (बिहार) कवी मुखलाल सिं लिहितात,

यह कौन ? कहाँ का वीर ? कौन रे गर्जन हमे सुनाया ।
शस्त्र नहीं कर मे फीर भी आतंक अजब है छाया ।
वंशवीर क्षत्रीय पुंगवका, वहि चतुर चौहान ।
एन मनमें है उमडू रहा रे देशभक्ति की शान ।

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org