विदेश दर्शन - १७४

अंधार कमी होत गेला आणि दोन्ही बाजूंचे 'लॅण्डस्केप' नजरेखाली आले. छोटया टेकडयांच्या रांगा दोन्हीकडे होत्या. त्यांना भिडेतो, नजर टाकील तिथपर्यंत गवताळ जमीन दिसत होती. गवत काढलेले दिसले. झुडुपांचे झापे ठिकठिकाणी होते. परंतु वृक्षराजी म्हणू असे काही नव्हते. डोंगर बोडकेच वाटले. सकाळ झाली पण पक्षांची किलबिल नाही, की कोठे त्यांचे थवे नाहीत. एकाकी पाखरू उडताना दिसे. पाणी भरपूर दिसले. त्यामुळे वैराण माळ याला म्हणता येणार नाही.

दुपारी को-ऑपरेटिव्ह फार्म पाहून झाले. 'कल्टिव्हेशन' या अर्थाने येथे शेतीचा विकास नाही. अॅनिमल हजबंडरी हा व्यवसाय. पास्टोरल सोसायटीचा शेती करण्याचा आता जोराचा प्रयत्न आहे. ३२ स्टेट फार्म्स आहेत. तांत्रिकतेवर भर. मनुष्यबळ कमी. सर्व वस्तीच मुळी १४ लाख.

चीनवरचा अविश्वास खोलवर रुजलेला आहे. रशियाचे वर्चस्व संपूर्ण. तरुण पिढीत नाराजी. त्यांच्या परिस्थितीत देशाला आज त्यांनी स्वीकारलेला मार्गच उपयुक्त व व्यवहार्य आहे. काही प्रमाणात का होईना स्वत्व आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org