विदेश दर्शन - १७१

८५ उलानबाटर (मंगोलिया)
४ सप्टेंबर, १९७६

दिल्लीहून विमान वक्तशीर २॥ वाजता निघाले. पावणे नऊ तासांच्या एकसारख्या उड्डाणानंतर सकाळी, युरोपच्या ७ वाजता फ्रँकफर्टला पोहोचलो. त्यानंतर प्रवास चालूच राहिला. दिल्ली सोडल्यानंतर ३२ तासांनी आज दुपारी एक वाजता येथे पोहोचलो.

मॉस्को ते उलानबाटरचा प्रवास १२ तासांचा आहे. इतका एकसारखा प्रवास-झोपेशिवाय थकविणारा प्रवास, मी बऱ्याच दिवसांनी केला. पण येथील आगत-स्वागत व या शहराचा आसमंत पाहून थकवा एकदम हलका झाला.

चार हजार फूट उंच असलेल्या एका पठारावरील हे दुपारच्या उन्हात न्हाऊन निघालेले आसमंत पाहून बऱ्याच वर्षांची इच्छा सफल झाली असे वाटले. डिसेंबरच्या सुरुवातीला असे, अशी थंडी आहे. गेल्या दीड-तीन दिवसांत हा फरक पडला आहे. यापूर्वी येथे बरेच गरम होत असे.

त्यांचा विदेशमंत्रि श्री. मॅगॉलिन दुगर सुरेन, हा मोठा अनुभवी मुत्सद्दी आहे. (गेल्या वर्षी आपल्याकडे आलेले यांचे विदेशमंत्रि खातेपालटामुळे कृषिमंत्रि झाले आहेत.)

दिल्लीला ते १९६०-६१ साली राजदूत होते. त्या वेळी मी मुंबईला होतो. नंतर चार-पाच वर्षांची एक टर्म त्यांनी विदेशमंत्रि म्हणूनही पार पाडली. नंतर जिनिव्हा व न्यूयॉर्क येथे पी. आर्. म्हणून काम केल्यानंतर ते पुन्हा गेल्याच महिन्यात विदेशमंत्रि झाले.

श्री. सुख बाट(त)र मंगोलियन क्रांतीचे प्रमुख नेते - त्यांचा हा नातजावई. परंतु नात्यापेक्षाही त्याच्या अंगी असणाऱ्या गुणांमुळेही त्याचे स्थान कायम आहे असे नि:संकोचकपणे म्हणता येईल.

सत्तेच्या रचनेत त्यांचे नेमके स्थान सांगणे अवघड आहे. नंबर १ त्सिबनबाल (चिबनबाल) Chairman of Presidiam of Peoples Great House (लोकसभा), नंबर २ Chairman and council of minister. नं. ३, ४, ५ कोण हे लवकर समजत नाही.

सर्व काही लिहिणे अशक्य आहे. तरीपण स्मृति म्हणून काही उल्लेख करून ठेवतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org