अधिक पावसाचे क्षेत्र :
ह्यात ठाणे, रायगड जिल्ह्यांचा उत्तर भाग आणि नासिक, नगर पुणे या जिल्ह्यांतील पश्चिमतम भागांचा समावेश होतो. तांबस किंवा तपकिरी रंगाचा (non latevitic) मातीच्या जमिनी ह्या भागात प्रामुख्याने आढळतात. भात, तृणधान्ये आणि डाळी ही येथील मुख्य पिके होत.
घाट विभाग :
ह्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर आणि नासिक जिल्ह्यांचा पश्चिम भागांचा समावेश होतो. या भागातील पर्जन्यमान सरासरी २००० ते ४००० मि. मी. आढळते. येथे दोनप्रतींच्या जमिनी आढळून येतात. एक उथळ व फिकट तपकिरी आणि दुसरी गडद तपकिरी व कंकरयुक्त जमीन जी डोंगराच्या उतारावर व लालसर तपकिरी. ही पश्चिम भागात उंचावर आढळते. या भागातील मुख्य पीक म्हणजे डोंगरी तृणधान्ये होय.
(१) संक्रमण विभाग : (Transition Zone I)
या विभागाश्चतपश्चिमघाट उतारावरील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, नासिक व धुळ्याचा भाग येतो. या भागातील वार्षिक पर्जन्यमान हे सरासरी १२५० ते २५०० मि.मी. असते. येथील जमिनी बॅसाल्टखडकापासून तयार झालेली काळी व लाल रंगाची असते. येथील प्रमुख्य पीक हे भाग असून खोलगट भागात बाजरी, ज्वारी, आणि भुईमूग ही पिके घेतली जातात.
(२) संक्रमण विभाग : (Transition Zone II)
यात धुळे, नासिक, नगर, सांगली, सातारा जिल्ह्यांचा पश्चिम मध्य भाग आणि कोल्हापूर जिल्ह्याचा ईशान्य भागाचा समावेश होतो. या भागातील वार्षिक पर्जन्यमान हे सरासरी ७०० मि.मी. ते १२५० मि.मी. इतके आढळते. येथील जमिनी गडद तपकिरी रंगांच्या असून जमिनीखाली डेक्कर ट्रॅप हा खडक आढळतो. बाजरी, ज्वारी आणि भुईमूग ही ह्या भागांतील प्रमुख पिके होत.
अवर्षणप्रवन विभाग :
ह्या विभागात धुळे, नासिक, नगर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्याचा पूर्वभाग तसेच सोलापूर जिल्ह्यांचा बराच मोठा भाग आणि औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि जळगांव जिल्ह्यांचा पश्चिम भागाचा समावेश होतो. येथील जमीन काळपट, तपकिरी रंगाची आहे. जमिनीची खोली कमीजास्त असून तिचा पोतही निरनिराळ्या प्रकारचा आढळतो. येथे प्रामुख्याने तृण धान्याचे उत्पादन होते.
पर्जन्याचा प्रदेश :
या प्रदेशात जळगांव, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, अकोला, अमरावती हे जिल्हे येतात. या भागातील पर्जन्यमानाचे प्रमाण सरासरी ७०० ते ९०० मि.मी. इतके आहे. या भागातील माती ही गडद तपकिरी ते काळी (calcavean clay loam) रंगाची व विविध खोलीची आढळते. ज्वारी, डाळी, कापूस आणि भुईमूग ही या भागातील प्रमुख पिके आहेत.