महाराष्ट्रातील दुष्काळ - ३१

परिशिष्ट - डी

१९७६ ते १९८६ या दहा वर्षात राष्ट्रीय उत्पन्नात झालेल्या वाढीचे प्रत्यक्ष प्रमाण आणि आशियातील काही निवडक राष्ट्रांतील दरडोई १९८५ सालचे उत्पन्न.

तक्ता नं ४ (तक्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

परिशिष्ट - ई

१९८० सालापर्यंत सर्व पाटबंधार्‍यांच्या योजना पूर्ण करणे हे आमच्या मते अत्यंत आवश्यक आहे.  महाराष्ट्रातील विकास हा सर्वस्वी महाराष्ट्रातील पाटबंधारे योजनांवरच अवलंबून आहे आणि म्हणून पाटबंधारे योजना १९८० सालापूर्वी सर्वाधिक अग्रक्रम देऊन पूर्ण करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.

(महाराष्ट्र पाटबंधारे आयोग)

परिशिष्ट - एफ

भारताची औद्योगिक विकासाची गती ही पंचवार्षिक योजनांच्या आराखड्यापेक्षा कितीतरी मागे राहिली आहे.  पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांत औद्योगिक विकासाची गती अनुक्रमे ७,१०.५ व ११.०५ अशी निश्चित करण्यात आली होती.  प्रत्यक्षात ६, ७.२५, आणि ८ अशा गतीने औद्योगिक विकासाची वाढ झाली.  तथापि, पहिल्या तीन पंचवार्षिक योजनेतील विकासाची गती ही उद्दिष्टापेक्षा कमी असली तरी तितकीशी असमाधानकारक नव्हती.  पाचव्या आणि सहाव्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट ८ टक्के निश्चित करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात ४.८ टक्के विकासाची गती राहिली.  ही विकासाची १९७० ते १९८२ दरम्यानची ४.३ विकासाची गती ही सर्वात खालच्या श्रेणीच्या जगातील जे तेवीस देश आहेत त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक अशी आहे.  या तेवीस देशांच्या यादीत बांगला देश, हैती ब्रह्मदेश, मालावी, युगांडा इत्यादी अतिशय मागासलेले देश समाविष्ट आहेत.  भारत या देशांच्या जवळपास आहे.

विशेष म्हणजे भारत जगातील मध्यम श्रेणीतील विकसनशील ७१ देशांच्या यादीत नोंदला जात नाही.

१९५६-५७ ते १९८१-८२ चे दरम्यान राष्ट्रीय उत्पन्नातील शेती उत्पादनाचे प्रमाण (१९७०-७१ च्या किंमतीवर आधारित) तुलनात्मक द्वारा.

  १९५६-५७ १९८१-८५
शेती ५८.४ ४०.७

शेती उत्पादनातील वाढीचे प्रमाण
उत्पादन निर्देशांक (Compound Growth Rate)

कालखंड अन्नधान्य व्यापारी पिके सर्व पीक सर्व पिकांचा निर्देशांक
१९५०-५१ ते १९६४-६५ ३.१ ३.५ ३.२ २.४
१९६७-६८ ते १९८२-८३ २.५ २.५ २.४ २.२

परिशिष्ट - जी
भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापारात वाटा

वर्ष जगातील निर्यातीतील वाटा
 १९६०  १.०४
१९६५ ०.९०
१९७० ०.६५
    १९७१     ०.५८
१९७५ ०.५०
१९७७ ०.४८

टीप :  १९५० च्या सुमारास भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापारात वाटा सुमारे अडीच टक्के होता

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org