महाराष्ट्रातील दुष्काळ -२०६

परिशिष्ट ई 

सहाय्यक ग्रंथ सूची
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
विविध नामवंत संस्थांच्या ग्रंथालयातील विचार-धन जिज्ञासूंची सोय व्हावी हे ध्येय
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'महाराष्ट्रातील दुष्काळ आणि जलसंपत्तीचे नियोजन' ह्या ग्रंथातील दुष्काळ आणि पाणी ह्या विषयावर अधिक वाचन करू इच्छिणार्‍या जिज्ञासूंसाठी काही महत्त्वाच्या ग्रंथांची यादी.  ही यादी उपलब्ध करून देणार्‍या संस्थांचे आम्ही कृतज्ञ आहोत.

सौजन्य  :  मुंबई विद्यापीठी  :  जवाहरलाल नेहरू ग्रंथालय

१.  सरदेसाई, गो. वा. :  दुष्काळाशी मुकाबला - विविध सूचना, वैभव, मुंबई, वर्ष ३९ (५) फेब्रु. १९७३ पृ. २०-२५.

(जंगले, तलाव, गवताची लागवड करून दुष्काळाचे संकट करायचे दूर करा येईल या विचाराबरोबर अनेक लोकांच्या सूचना देण्यात आल्या आहेत.)

२.  एकोणीसाव्या शतकांतील महाराष्ट्र :  संपादकीय, साहित्य सहकार, मुंबई, १९७१ वर्ष २१ (३) जून १९७१ पृ. ५-२०.

(निरनिराळ्या नियत-कालिकांतून दुष्काळाविषयी आलेल्या माहितीच्या आधारावर वर्णन व मुंबई सरकारचे संबंधीचे निवेदन.

३.  एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र :  संपादकीय, साहित्य सहकार, मुंबई.  वर्ष २१ (४) जुलै १९७१ पृ. ५-२०.
(दुष्काळग्रस्त शेतकरी यासंबंधी माहिती, दुष्काळाचे भयंकर स्वरूप व लोकांचे कर्तव्य ह्या विषयी निरनिराळ्या नियतकालिकांत आलेली माहिती.  संकलित स्वरुपात दिली आहे.)

४.   महाराष्ट्रातील भीषण दुष्काळ :  एक दृष्टिक्षेप, मुंबई वैभव, वर्ष ३९ (४) जाने. १९७३ पृ. ६-१०.

(गेल्या शंभर वर्षात निर्माण झाली नसेल इतकी भीषण टंचाई या शब्दात राज्यातील परिस्थितीचा आढावा.)

५.  सरदेसाई, गो. वा. :  दुष्काळाचे संकट कायमचे नष्ट करता येईल, संपदा. पुणे, अंक ७ जाने. १९७३ पृ. ९-१४ चित्र.
(महाराष्ट्रात अनेक भागात येणारे दुष्काळाचे संकट कायमचे नष्ट करण्याविषयी सूचना,)

६.  सुब्रह्मण्यम. व्ही. :  महाराष्ट्राचा दुष्काळाशी सामना.
'संपदा' पुणे, अंक ९ मार्च १९७३ पृ. ९-११.

(महाराष्ट्रातील वारंवार पडणार्‍या दुष्काळामुळे निर्माण होणार्‍या परिस्थितीचा सामना करण्यास सरकार व जनता यांचया सहकार्याची आवश्यकता.)

७.  गोरे, अनिल  :  शेतकरी उध्वस्त, निसर्ग उजाड :  मुळशीतून फेरफटका.  माणूस पुणे, वर्ष १९ (४) २३ जून १९७९ पृ. १२-१५.
(पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील परिस्थिती प्रत्यक्ष पहाणीवर आधारित लेख.)

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org