महाराष्ट्रातील दुष्काळ - 199

देखभाल आणि आधुनिकीकरण

५.१   प्रचंड मोठी गुंतवणूक करून उभारलेल्या ह्या अजस्त्र वास्तूंची देखभाल योग्य प्रकारे करून त्या उत्तम रीतीने कार्यरत राहतील ह्याची काळजी घेण्यात यावी.  वार्षिक अंदाजपत्रकात ह्याविषयी योग्य ती तरतूद व्हावी.

५.२   अशा वास्तूंची तपासणी नियमितपणे करण्यात यावी.  त्याचप्रमाणे प्रकल्पांच्या कार्यपद्धतीमध्ये कालानुरुप फेरबदल व्हावेत आणि आधुनिकीकरण आणावे.

वास्तूंची सुरक्षितता

६.१   पाण्याची साठवणी करणारी धरणे आणि तत्संबंधी यंत्रसामुग्री ही सुरक्षितपणे काम करत राहील.  ह्याची जबाबदारी राज्य व केंद्रीय शासनांनी योग्य संघटनाद्वारे घेतली जाईल अशी तजवीज करावी.  अशा बाबतीत केंद्रीय आदेश व मार्गदर्शक तत्त्वांची नेहमी पूर्वतपासणी व्हावी व त्यात सुधारणा करावी.  प्रकल्पाच्या विविध अंगाचे आजतागायतीकरण व पुनर्रचनादि कार्ये जागरूकपणे व्हावीत.  तज्ज्ञातर्फे नियमितपणे ह्यांची तपासणी व सर्वेक्षण होत राहावे.

भूगर्भातील पाणी-विकास

७.१   भूगर्भातील पाण्यांच्या साठ्यांचे, वैज्ञानिक तत्त्वानुसार, पुनर्मूल्यांकन वेळोवेळी केले जावे.  अशा पाण्याचा दर्जा कसा आहे आणि ते उपयोगात आणण्यासाठी आर्थिक दृष्ट्या परवडणारे आहे की नाही, हा विचार तपासला जावा.

७.१   भूगर्भातील पाण्यांच्या साठ्यांचे, वैज्ञानिक तत्त्वानुसार, पुनर्मूल्यांकन वेळोवेळी केले जावे.  अशा पाण्याचा दर्जा कसा आहे आणि ते उपयोगात आणण्यासाठी आर्थिक दृष्ट्या परवडणारे आहे की नाही, हा विचार तपासला जावा.

७.२   भूगर्भातील पाण्याचा उपयोग करताना, ते पाणी परत भूगर्भात भरले जाईल की नाही, आणि समत्वाने त्याचा लाभ मिळेल की नाही ह्याची खात्री बाळगावी.  भूगर्भात पाणी साठवण्याचे प्रकल्प आखले जावे आणि त्यांचा अंगिकार भूगर्भात पाणी जिरवून भरपाई करण्यासाठी व्हावा.

७.३   भूगर्भावरील व भूगर्भातील पाण्याचा एकमेकांशी पूरक आणि चतुरंग विकास, तसेच त्यांचा एकमेकांना पारस्पारिक सहाय्यक उपयोग, ह्याविषयी प्रकल्प संकल्पनेच्या काळापासून जागृती राखण्याची गरज आहे व हा प्रकल्पाचा आवश्यक भाग असावा.

७.४   समुद्र किनारपट्टीजवळील भूगर्भातील पाणी गरजेपेक्षा आणि जादा प्रमाणात उपसले जाणे टाळावे, नाहीतर, समुद्राचे खारे पाणी हे किनार्‍यावरील गोड्या पाण्यात शिरण्याची भीती असते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org