महाराष्ट्रातील दुष्काळ - ११७

६.  पावसाळ्याचे पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था करा

डी. बी. उगले
नामवंत पाणी तज्ज्ञ आणि नियोजनबद्ध शेतीचे प्रचारक
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मूळ प्रश्न पाण्याच्या उपयोगी वापराचा आहे.  धरणांच्या कडेकडेने वाया जाणारे पाणी वाचवण्यासाठी कालवे काढावे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

''महाराष्ट्रातील पाण्याच्या अभावाचा प्रश्न हा महाराष्ट्रातल्या एक चतुर्थांश भागाचा प्रश्न आहे.  त्या अवर्षणग्रस्त क्षेत्राखाली ८७ ते ८९ तालुके येतात, असे आतापर्यंतच्या एकूण पहाणीवरून दिसते.  तेव्हा हा प्रश्न अत्यंत गंभीर प्रश्न आहे.  मी आष्टी तालुक्यात राहातो.  तेथे पाण्याचा गंभीर प्रश्न आहे.  आम्हाला पाणी मिळावे म्हणून लोक आंदोलन करणार आहेत.  आम्ही कुकडी धरण झाल्यानंतर; कुकडीचे पाणी नगर जिल्ह्यातल्या कर्जत व जामखेड यांना मिळाल्यानंतर ते आष्टी आणि नगर तालुक्याला मिळावे, ह्या हेतूने आम्ही लोकआंदोलन चालू केले आहे.  

आमची मागणी अशी आहे की कुकडी धरणाचे पाणी पाचमाही पद्धतीने पाणी नेण्याचा निर्णय मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार ह्यांनी त्यांच्या काळामध्ये घेतला होता.  हे पाणी आठमाही पद्धतीने देण्याचे शासनाने मान्य केले आहे.  ते पावणे पाच लाख हेक्टर शेतीला पाणी मिळेल अशी योजना मूळ प्रकल्पाच्या आकडेवारीत आहे.  त्या अभ्यासानुसार जिरायती भागाला जर चारमाही पाणी दिले, आणि बागायतीला चारमाही पाणी दिले तर म्हणजेच एक जिरायत आणि एक बाकायत मिळून अडीच लक्ष हेक्टर क्षेत्राला पाणी मिळावे असा हिशेबकरून कुकडी धरणाचे पाणी वाटूनही उरते.  हे पाणी दुष्काळी भागातले पाणी आहे.  हे पाणी आष्टी, जामखेड आणि उस्मानाबाद भागातील भूम तालुका ह्या प्रदेशाला मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे.  ह्यासाठी आमचे हे लोक-आंदोलन आहे.  ह्याशिवाय मूळ पाण्याची अधिक उपलब्धता व उपयोगिता वाढवणे हाही प्रश्न आहे.  जेणे करून कुकडी धरणामुळे आणखी दोन लाख एकर भूमीला पाणी मिळेल अशा तर्‍हेच्या काही योजना तयार आहेत.  त्या अमलात आणण्याची मोठी गरज आहे.

ह्या दुष्काळी भागांसाठी आणखी एक नवीन धरण व्हावे ही काळाची गरज आहे.  हा मुद्दा शंकरराव कोल्हे यांनी आपल्या भाषणात मांडला आहे.  खरे म्हणजे, मी त्या मुद्याला पाठिंबा देण्याकरता उभा आहे.  आपणाला माहीत आहे की सह्याद्रीचा पट्टा तापी खोर्‍याला आडवा आला आहे.  महाराष्ट्र देश म्हणजे कोकण आणि माळव्यापासून सुरू झालेले पठार. पावसाळी पाण्याचे सह्याद्रीमुळे दोन भाग केले आहेत.  म्हणजेच सह्याद्रीच्या पलीकडे म्हणजे पश्चिमेकडे जाणारे जे पाणी आहे, ते पाणी आपण पूर्वेकडे वळवून घेण्याच्या दृष्टीने निश्चितपणे विचार केला गेला पाहिजे, अशी माझी सूचना आहे.  गंगेचे पाणी, सिंधूचे पाणी, किंवा ब्रह्मपुत्रेच पाणी ह्याबद्दल आज आपल्याला चर्चा करण्याचे कारण नाही. कारण अशी चर्चा केल्यामुळे महाराष्ट्राच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही.  परंतु कोकणातले पाणी देशावर कसे आणावे हा विचार आपण अवश्य केला पाहिजे.  तज्ज्ञांचे असे मत आहे की सह्याद्रीच्या काही रांगांची उंची तपासावी आणि एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपण बांध टाकून पावसाचे वाहून जाणारे पाणी थोपवावे.  हे पाणी वळवले तर ते नजिकच्या काळात दुष्काळी भूप्रदेशांकडे वाहवून नेणे शक्य आहे.  समुद्राकडे जे पाणी जात आहे ते पूर्व बाजूला वळवण्याची गरज आहे.  तसे जिथे जिथे करणे शक्य आहे आणि तसे जर केले तर माझ्या मते पाणी कमतरतेचा प्रश्न सुटेल.  ह्यामुळे खानदेशमधला जो भाग आहे त्याचाही प्रश्न सुटू शकतो.  मराठवाड्याचा प्रश्नही सुटण्यासाठी म्हणून एका विशिष्ट उंचीवर सह्याद्रीला बांध घातला तर पाण्याचे स्थलांतर करणे शक्य आहे.  आता प्रश्न आहे की हे कसे करावे ?

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org