महाराष्ट्रातील दुष्काळ - १०१

ठिबक पद्धतीने पिके दुप्पट

माझी माहिती अशी आहे की, एका प्रकाराला ठिबक पद्धतीने पाणी दिले तर १२४ इंच (३००० से.मि.) पाणी लागते.  इस्रायल, अमेरिका आणि जपानमध्ये काही ठिकाणी ही योजना अद्ययावत पद्धतीने राबविली जाते.  ठिबकपद्धती किंवा गाडगे गाडगे टाकून पाणी देणे किंवा लोडगाडीमध्ये ड्रम टाकून पाणी देण्याची पद्धती केली तर त्याचा आपल्याकडील शेतीला निश्चित फायदा होईल व पाण्याचा वापरसुद्धा नीटपणे होईल.  बारामती कृषी प्रतिष्ठानातलेच श्री. अप्पासाहेब पवार, गांधी साहेब यांनी हे सगळ्या प्रयोगांचा निष्कर्ष असा आहे की ठिबक पद्धतीने आपण पाणी दिले तर बागायती दुप्पट होईल, आणि त्यामुळे आपले प्रमाणे ११ टक्क्यांवरून २१ टक्क्यांवर आणि ३२ टक्क्यांवर येणे कठीण नाही.

ठिबक पद्धतीमध्ये प्रत्यक्षात पाणी खत आणि खताचा वापर, औषधांचा वापर देण्याची व्यवस्था असते, त्यामुळे ते खत औषध नेमक्या ठिकाणी जाऊ शकते, आज गवत वाटते त्यामुळेसुद्धा जमिनीतील जास्तीत जास्त ताकद वाया जाते.  या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार केला तर पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन केले तर आपल्याला ह्या गोष्टी वाचविता येतील.  आणि त्याचे क्षेत्रफळ दीडपट पावणे दोनपट, दुप्पट नेता येईल.

शेवटी महत्वाची गोष्ट अशी की ज्या गोष्टी शेतकर्‍यांना समजतात त्या गोष्टी समजणारी माणसे महाराष्ट्र शासनामध्ये आहेत ही आनंदाची बाब आहे.  आज महाराष्ट्रातील शेतकरी त्याचा चेहरा मरगळलेला आहे.  त्याला सुरकुत्या पडलेल्या आहेत तो दुरूस्त करण्याचे काम करणे एवढेच तुमचे आमचे काम आहे.  महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, ज्योतीबा फुले यांचे फोटो आपण पाहतो.  त्यांचा आपल्याला एकप्रकारचा धाक आहे.  तसा धाक त्या सामान्य शेतकर्‍यांचा आपल्याला असावयास पाहिजे.

या देशाचे वर्णन ''मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा'' असे केलेले आहे.  पाणी मागताना येथील माणसाने मुख्यमंत्र्यांना, पंतप्रधानांना पाणी मागितले नाही.  त्याने दगडाला पाणी मागितलेले आहे.  ''धोंडी धोंडी पाणी दे'' असे म्हटलेले आहे.  हाच तो त्यांचा देव आहे.  आणि तो महत्वाचा आहे.  आणि आता मी सांगितलेली कविता ही मातीची, दगडाच्या देवाची कविता आहे.  नदी नाल्याचे पाणी वहाते.  त्याला आम्ही पाणी म्हणत नाही.  आमच्या शेतामधून गंगा वहाते असे आम्ही म्हणतो.  आमचे सर्व संदर्भच त्या ठिकाणी बदलून जातात.  म्हणूनच हे नदीनाल्याचे पाणी आणि आभाळातील पाणी हे एकत्र आले पाहिजे.  आभळातले चांदणे आमच्या जोंधळ्यावर आले पाहिजे.  हे पाणी जर आपण अडविले, जिरविले तर आपला देश सुजलाम, सुफलाम् होणार आहे. मी म्हणणार असलेल्या कवितेचे शब्द असे आहेत -

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org