- १९६६ नोव्हेंबर १४, केंद्रामधये गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली.
- १९६९, कानपूर विश्वविद्यालयाची 'डॉक्टर ऑफ लॉ' सन्मानपूर्वक बहाल.
- १९७० जून २८, भारताच्या अर्थमंत्रिपदी नियुक्ती.
- १९७०, औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाची 'डॉक्टर ऑफ लॉ' ही सन्मान पदवी.
- १९७४, कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठाची 'डॉक्टर ऑफ लॉ' ही पदवी.
- १९७४ ऑक्टोबर, भारताचे परराष्ट्रीय व्यवहार मंत्रीपदी नियुक्ती.
- १९७५, गियान, क्युबा, लेबेनॉन, इजिप्त, पेरू, अमेरिका, अफगाणिस्तान, इराक, कुवेत, फ्रान्स आदी राष्ट्रांना भेटी.
- १९७५ डिसेंबर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, कराड येथे दुर्गा भागवतांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष.
- १९७६, परभणी, मराठवाडा कृषी विद्यापीठाची 'डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी' ही पदवी.
- १९७६, तुर्कस्थान, अल्जेरिया या देशांना भेटी.
- १९७६, सदिच्छा राजदूत म्हणून अमेरिकेतील होस्टन येथील टेक्सास शहरातर्फे मानपत्र.
- १९७७-७८, लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड (मान्यता प्राप्त अशा विरोधी पक्षाचे लोकसभेतील स्वातंत्र्यानंतरच्या काळातील पहिले विरोधी पक्ष नेते )
- १९७८, इंदिरा गांधी यांच्या बरोबर मतभेद होऊन संजीव रेड्डी काँग्रेसमध्ये प्रवेश.
- १९७८, महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली 'पुलोद' मंत्रिमंडळ स्थापन. ( यशवंतरावांचा पुलोदला पाठिंबा असल्याचा संशय )
- १९७९, चरणसिंग मंत्रिमंडळात उपपंतप्रधान आणि गृहमंत्री
- १९८०, सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवड, संजीव रेड्डी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातून निवडून गेलेले एकमेव खासदार.
- १९८१, इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश
- १९८२, आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष
- १९८३ जून १, पत्नी सौ. वेणुताई यांचे निधन
- १९८४, पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी, लिट्. ही पदवी बहाल केली.
- १९८४, 'कृष्णाकाठ' आत्मचरित्रग्रंथास साहित्यसम्राट न. चिं. केळकर पारितोषिक
- १९८४ नोव्हेंबर २५, सायंकाळी ७-४५ वाजता दिल्ली येथे निधन.
- १९८४ नोव्हेंबर २७, दुपारी ३-४० वाजता कराड येथे कृष्णाकोयनेच्या प्रीतिसंगमावर अंत्यसंस्कार.
- १९८६ मे ३१, क्षेत्र माहुली, जि. सातारा येथील रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा 'सामाजिक न्याय पुरस्कार' ( मरणोत्तर )